Thackeray Vs Rana: अमरावतीत राजकारण तापलं; राणा समर्थकांनी उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे पोस्टर फाडले

Shivsena News: उद्धव ठाकरे सध्या अमरावती दौऱ्यावर आहेत.
Shivsena
Shivsena Sarkarnama
Published on
Updated on

Amravati Political News: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणीला लागले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांचा हा विदर्भ दौरा पक्षसंघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्वाचा मानला जात आहे.

या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवीचे दर्शन घेऊन दौऱ्याला सुरवात केली. यवतमाळमध्ये पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर दिग्रसमध्ये शिवसैनिकांना संबोधित केलं. त्यानंतर ते रविवारी सायंकाळी सात वाजता अमरावतीत दाखल झाले. सोमवारी अमरावतीत शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पण या आधीच अमरावतीत पोस्टर फाड वॉर रंगले आहे.

Shivsena
Maharashtra Political Crisis : ''...तर महाराष्ट्रात आणखी एक मोठा राजकीय भूकंप होईल! ''; काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या समर्थकांनी ठाकरेंचे पोस्टर फाडले आहे. त्यामुळे अमरावतीत राजकारण तापलं आहे. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्यावतीने श्रावणमासाच्यानिमित्ताने सामूहिक हनुमान चालिसा पठणाचे शहरात पोस्टर लावले होते. पण या पोस्टरवर टाकलेल्या मजकूरावरून शिवसैनिकांनी ते पोस्टर फाडले. त्यानंतर राणा यांच्या समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर फाडले.

Shivsena
Pimpri-Chinchwad NCP: एका गव्हाणेंची अजितदादांना साथ; तर दुसरे शरद पवारांबरोबर...

दरम्यान, ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर फाडल्यामुळे अमरावतीत राजकारण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सोमवारी आयोजित मेळाव्यात नेमकी काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com