Sushma Andhare on Devendra Fadnavis : राज्यातील महिला लोकप्रतिनिधींवरील हल्ला, अकोल्यात शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांच्या घरावर हल्ला आणि सकाळी फिरायला निघालेले मनसेचे संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ला, या घटना राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याची ताजी उदाहरणे आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे कुचकामी असल्याचा हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.
अकोला येथील शासकीय विश्रामगृहात आज अंधारेंनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत काळजी व्यक्त केली. दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांच्यावर दिवसाढवळ्या हल्ला झाला. परवा अकोल्यात शिंदे गटातील संपर्कप्रमुखाच्या गटाने जिल्हा प्रमुखाच्या घरावर हल्ला केला. आज सकाळी फिरायला निघालेले मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला.
ही स्थिती या राज्यात कायद्याचे राज्य आहे काय, याचा विचार करण्यास भाग पाडणारी आहे. जिथे आघाडीवर काम करणारे लोकप्रतिनिधी सुरक्षित नाहीत, तेथे सर्वसामान्य जनता किती सुरक्षित असेल, असा प्रश्न करून सुषमा अंधारे यांनी फडणवीस यांच्यावर कुचकामी गृहमंत्री असल्याचा आरोप केला. त्यांच्यावर फार वर्कलोड आहे. अकोल्याचे पालकमंत्री म्हणून फडणवीस यांनी आतापर्यंत फक्त एकच नियोजन समितीची सभा घेतली.
वर्कलोड कमी करावा..
इतर सहा जिल्ह्यांचा लोडही त्यांच्यावर आहे. हा वर्कलोड कमी करण्यासाठी त्यांनी इतरांना संधी द्यावी व गृहमंत्री या पदाला न्याय द्यावा, असे अंधारे म्हणाल्या. पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, शहरप्रमुख राजेश मिश्रा, राहुल कराळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
गृहमंत्री म्हणून अपयशी ठरलेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्यात आघाडीवर काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर होणाऱ्या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्रिपदाचा (Home Minister) राजीनामा द्यावा व इतरांना संधी द्यावी, अशी मागणी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली. अमरावती विभागातील बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्याकडे गृहमंत्रिपद दिले तर ते या पदाला चांगला न्याय देतील. तसाही बच्चू कडू यांच्यावर फडणवीसांनी अन्यायच केला आहे, असे अंधारे म्हणाल्यात.
सोमय्या अकोल्यात येऊन चौकशी करतील का?
भाजपचे किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या नेत्यांना लक्ष्य करीत अनेक चौकश्या केल्या. त्यांच्याच पक्षाचे नितीन गडकरी यांनी कंत्राट दिलेला अकोल्यातील उड्डाण पुल सहा महिन्यांत खचला. नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला. त्याची चौकशी करण्यासाठी किरीट सोमय्या अकोल्यात येतील का, असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.