Teacher News : शिंदे-फडणवीस सरकारचा ‘तो’ आदेश बेरोजगारी वाढवणारा !

Maharashtra : पुन्हा कंत्राटी पद्धतीवर त्यांना घेण्याचा जीआर कशाला काढला?
Devendra Fadanvis and Eknath Shinde
Devendra Fadanvis and Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

The posts of teachers are vacant in many places : जर शिक्षक ७०व्या वर्षापर्यंत अध्यापनाचे कार्य करू शकतात, तर मग त्यांना ५८व्या वर्षी निवृत्त का करता? निवृत्त केल्यानंतर पुन्हा कंत्राटी पद्धतीवर त्यांना घेण्याचा जीआर कशाला काढला, असा सवाल करत टीईटी पास झालेले भावी शिक्षकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर संताप व्यक्त केला आहे. (Prospective teachers expressed their anger at the Shinde-Fadnavis government)

सेवानिवृत्त शिक्षकांनाच कंत्राटी पद्धतीने नेमण्याचा शासनाचा निर्णयावर भावी शिक्षकांकडून तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. सुमारे २५ वर्षापूर्वी डीएड झाला म्हणजे हमखास नोकरी, असे समीकरण होते. ग्रामीण भागातील प्रत्येक तरुण डीएड होऊन शिक्षक होण्याचे स्वप्न बघत होते. डीएडला नंबर लागला की स्वर्ग दोन बोटे उरायचा. मात्र, शासनाच्या एका निर्णयाने नव्वद हजार टीईटी पास झालेले भावी शिक्षक कंत्राटी शिक्षक होण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होऊनही अनेक ठिकाणी शिक्षकांची पदे रिक्त आहेत. अशा वेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने रिक्त पदांवर शिक्षकभरती होईपर्यंत सेवानिवृत्त शिक्षकांनाच कंत्राटी पद्धतीने नेमण्याचा निर्णय घेतला आहे. नियोजित शिक्षक भरती उच्च न्यायालयातील रिट याचिकांमुळे लांबल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. यामुळे पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षकभरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत हा उपाय काढण्याचा निर्णय सरकारने घेतला.

यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी शिक्षण संस्था, तसेच अनुदानित शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षकांमार्फत कंत्राटी तत्त्वावर तात्पुरती रिक्त पदे भरली जातील. त्यामुळे पुन्हा एकदा नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बेरोजगार भावी शिक्षकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम (Eknath Shinde ) शिंदे-फडणवीस (Devendra Fadanvis) पवार सरकारने केले असल्याची संतप्त प्रतिक्रिया राज्यभरातून उमटत आहेत.

Devendra Fadanvis and Eknath Shinde
Teacher Recruitment : पहिल्या टप्प्यात 30 हजार तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची भरती करणार; केसरकरांची मोठी घोषणा

नव्वद हजार TET पास झालेले भावी शिक्षक उपलब्ध असताना सेवानिवृत्त शिक्षकांना पाचारण करणे, हे कोणते आधुनिक धोरण आहे, हे कळायला मार्ग नाही. आज नाही परंतु दहा वर्षांनी या अविचारी निर्णयाचे दुष्परिणाम समाजाला भोगणे अपरिहार्य दिसते , अशी तिखट प्रतिक्रियाही भावी शिक्षकांकडून व्यक्त होऊ लागल्या आहेत.

५८ व्या वर्षी थकले म्हणून निवृत्त केलं आणि तेच शिक्षक (Teacher) वयाच्या सत्तरी पर्यंत ताजे तवाने झाले खरं तर सरकार तरुण मुलांच्या आयुष्यातून सर्व्हिसचे वर्ष कमी करत आहे. आम्ही अभियोग्यताधारक या काळ्या जीआरचा निषेध करत आहोत.

वय झाल्यामुळे शारीरिक क्षमता कमी होते अध्यापनात अडसर होतो म्हणून कर्मचाऱ्यांना निवृत्त केले जाते आणि इकडे शासन तरुणांना सोडून वृद्धांना संधी देत आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया अभियोग्यधारक उमेदवारांकडून उमटत आहेत.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com