Telhara APMC Election Result : तेल्हाऱ्यात वंचित आणि शिवसेनेने (ठाकरे गट) दिली भाजपला मात !

APMC : तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अटीतटीची झाली.
Telhara APMC
Telhara APMCSarkarnama

सहकार क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अटीतटीची झाली. निकालाचे चित्र रविवारी (ता. ३० एप्रिल) रात्री उशिरा स्पष्ट झाले. रात्री उशिरापर्यंत निकालाचा गोंधळ सुरू होता. बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी सहकार पॅनल, वंचित बहुजन आणि उद्धव ठाकरे गटाचा वरचष्मा दिसून आला. (Vanchit Bahujan and Uddhav Thackeray group were seen to be dominant)

शेतकरी सहकार पॅनलला १० जागा मिळाल्या तर शेतकरी-भाजप पॅनलला सहा जागांवर समाधान मानावे लागले. दोन जागांवर अपक्ष निवडून आले. रविवारी रात्री उशिरापर्यंत गोंधळाची स्थिती आणि काही उमेदवारांनी मतमोजणीवर आक्षेप घेतल्यामुळे विजयी उमेदवारांचे निकाल जाहीर करण्यात आले नव्हते. परंतु प्राप्त वृत्तानुसार शेतकरी सहकार पॅनल, वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीचे रवींद्र बिहाडे यांनी २६२ मते मिळवून प्रतिस्पर्धी विशाल कोकाटे यांना ३० मतांनी पराभूत केले.

श्याम घोंगे यांनी २४३ मते मिळवून धनगर समाजाचे दिग्गज नेते व जिनींग व कॉटन मार्केटचे संचालक निळू बचे यांचा ५३ मतांनी पराभव केला, सुनील इंगळे यांनी २५८ मते मिळवून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रमेश दारोकार यांना चारही मुंड्या चीत करून २२ मतांनी धूळ चारली. महिला गटातून विजया शंकरराव ताथोड यांना २३२ मते मिळाली तर प्रतिस्पर्धी विजया विश्वंभर ताथोड यांना ३१ मतांनी पराभूत केले.

वंदना वाघोळे यांना २२२ मते मिळाली असून इंदू गेबड यांना ३५ मतांनी पराभूत केले. डॉ. अशोक बिहाडे यांनी १९९ मते मिळवून विजयी तर गौरव यादगिरे २०० मते मिळवून विजयी झाले. प्रा. प्रदीप ढोले २०७ मते, दामोदर मार्के २०५ मते घेऊन विजयी झाले. मोहन पाथ्रीकर यांनी २४५ मते मिळवून केवळ एका मताने देवानंद नागळे यांना पराभूत केले. परंतु त्यांचे निकाल सुरुवातीला जाहीर करण्यात आले नव्हते.

Telhara APMC
Parseoni APMC Election Results : केदारांशी लढता लढता भाजपची झाली दमछाक, पारशिवनीत उडवला धुव्वा…

शेतकरी भाजप पॅनलचे संदीप खारोडे २३६ मते मिळवून विजयी झाले, तर शांताराम काळे २२१ मते, पुंडलीक अरबट २२२, हरिदास वाघ १९७, सुभाष खाडे १७२ मते, लखन राजनकर २६१ मते मिळवून विजयी झाले. अपक्ष म्हणून व्यापारी/अडते मतदारसंघातून हरिश तापडिया आणि राजू टेकडीवाल निवडून आले आहेत. सर्वाधिक उमेदवार शेतकरी सहकार वंचित महाविकास पॅनलचे निवडून आले

दोन उमेदवार एक-एक मताने विजयी..

शेतकरी-भाजप (BJP) पॅनलचे हरिदास वाघ आणि शेतकरी (Farmer) सहकार पॅनलचे मोहन पाथ्रीकर हे दोघेही केवळ एक-एक मताने निवडून आल्यामुळे त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी फेर मतमोजणी मागणी केली. त्यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

Telhara APMC
Pombhurna APMC Result : पोंभुर्णावरून पुन्हा पेटला वाद, खासदार म्हणतात, कुणीही श्रेय घेऊन पाठ थोपटवून घेऊ नये !

रॅलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे, ओबीसी नेते ॲड. संतोष राहाटे, गजानन गवई, माजी जि. प. अध्यक्ष प्रतिभा भोजने, विद्यमान अध्यक्षा संगिता अढाऊ, माजी महिला आघाडी अध्यक्षा संतोषी निखाडे याच्यासह वंचित बहुजन आघाडी, सहकार, शेतकरी, महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com