Thackeray-Shinde Politics : उद्धव ठाकरे आज कुणावर तोंडसुख घेणार ?

Uddhav Thackeray In Amravati: अमरावती आणि नागपुरात बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray's Vidarbha tour started yesterday : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा कालपासून (ता. नऊ) सुरू झाला. आज (ता. १०) कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी अमरावती आणि नागपुरात बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांमध्ये मार्गदर्शन करताना ते कुणावर तोंडसुख घेतात, याकडे लक्ष लागले आहे. (The Shiv Sainiks welcomed him with loud slogans)

उद्धव ठाकरे यांचे काल (ता. नऊ) सकाळी नागपुरात आगमन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीत त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते यवतमाळकडे रवाना झाले. यवतमाळ, वाशिम, अकोला येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर काल रात्री ते अमरावतीमध्ये दाखल झाले. अमरावतीमध्ये त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

रवी राणा यांचा मतदारसंघ असलेल्या बडनेरातील जुनी वस्तीमध्ये मुस्लीम समाजातर्फे ढोल, ताशे आणि फटाक्यांच्या आतषबाजीत उद्धव ठाकरेंचे जोरदार स्वागत करण्यात आले. या स्वागताची चर्चा आजही अमरावतीमध्ये होते आहे. आज अमरावती येथे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात कार्यकर्त्यांची बैठक झाल्यानंतर ते नागपूरला रवाना होणार आहेत. सायंकाळी सिव्हिल लाइन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात ते कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहे.

राज्यातील सध्याचे फोडाफोडीचे राजकारण, अजित पवार यांच्या नेतृत्वात झालेले बंड आदींच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील त्यांच्या दौरा महत्त्वाचा आहे. नागपुरात एकप्रकारे या बैठकीचे रूपांतर सभेत होण्याची शक्यता आहे. विदर्भात पक्षाची पुनर्बांधणी करण्यावर त्यांचा भर आहे. त्यामुळे नागपुरातील होणाऱ्या बैठकीत ते कुणाला लक्ष्य करणार, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. त्यांच्यासोबत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार विनायक राऊत आदी नेतेही उपस्थित राहणार आहेत.

Uddhav Thackeray
ठाकरेंची Bhavana Gawali'न वर जहरी टीका | Shivsena | Uddhav Thackeray | NCP | BJP | Sarkarnama

काल पोहरादेवी येथे बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटात गेलेल्या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) आणि दारव्हा-दिग्रसचे आमदार, विद्यमान मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. आज (ता. १०) अमरावती आणि नागपुरात ते कुणावर निशाणा साधणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आज त्यांच्या टार्गेटवर कोण असणार याची उत्सुकता शिवसैनिकांना लागली आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com