Thackeray vs Shinde : हिंमत असेल; तर भाजप नेत्यांच्या फोटोवर हातोडा चालवून दाखवा..!

Shivsena : त्या शाखेत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होता.
Uddhav Thackeray and Eknath Shinde
Uddhav Thackeray and Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray on CM Eknath Shinde : त्यांना लोकांच्या घरी चूल पेटवायची नाहीये, तर लोकांची घरं पेटवायची आहे. ज्या बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली, त्या लोकांना मोठं केलं, ती शिवसेना संपवायला ते निघाले आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टिका केली. (Uddhav Thackeray severely criticized Chief Minister Eknath Shinde)

त्यांची मजल इथपर्यंत गेली की, त्यांनी शिवसेनेची शाखा तोडून टाकली. त्या शाखेत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होता, त्या फोटोवरही हातोडा चालवला. तरीही मिंधे गप्प होते. भगतसिंह कोश्यारी नावाचं पार्सल गेलं ते बरं झालं. ते छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासह सर्व महापुरुषांचा अपमान करत सुटले होते. तरीही मिंधे गप्प होते, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तोफ डागली.

मिंधे मुख्यमंत्री असताना शिवसेनेची शाखा तोडली गेली. बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडे मारले गेले, हिंमत असेल तर एखाद्या भाजप नेत्याच्या फोटोवर हातोडा मारून दाखवा, दिल्लीवरून तुमच्यावर असा हातोडा पडेल की उठताही येणार नाही आणि कळणारही नाही की, नेमकं काय झालं, असे म्हणत एकनाथ शिंदेवर त्यांनी निशाणा साधला.

मुंबई महापालिकेची चौकशी करा, पण तुमच्या बुडाखाली काय जळत आहे, ते सद्धा बघा. पीएम केअर फंडामध्ये कोट्यवधी रुपये जमा करण्यात आले. तो जनतेच्या खिशातील पैसा होता. हा सरकार निधी नाही, तर मग त्याचा मालक कोण? बिना टेंडर वापरले का पैसे, आदी सवाल त्यांनी मोदी सरकारला केले.

Uddhav Thackeray and Eknath Shinde
Uddhav Thackeray : "निवडणूक आयोगाला पक्षाचे नाव देण्याचा अधिकार नाही"| Shivsena|Amravati |Sarkarnama

कोरोनाच्या (Corona) काळात धान्य मोफत दिले, लस फुकट दिली, असं सांगत सुटले होते. पण ते तुमच्या घरच्या पैशाने वाटले नाही, ज्यांच्याकडून पैसा घेता त्यांच्याच पैशाने लस आणि धान्य जनतेला दिले. यावर कहर म्हणजे कोरोनावरची लससुद्धा मोदींनी बनवली, असं फडणवीस म्हणतात. आता यांच्याशी काय बोलणार. अशा खोटारड्या लोकांशी काय बोलणार, असे म्हणत ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही (Devendra Fadanvis) निशाणा साधला.

जशी त्यांनी ‘चाय पे चर्चा’ केली. तशी त्यांच्या गैरकारभाराची चर्चा झाडाच्या पारावर, शेतांच्या बांधांवर, चहा टपरीवर, पान ठेल्यावर करा. अध्यक्षीय हुकूमशाहीच्या दिशेने आपला देश चालला आहे. तसे होऊ द्यायचे नसेल, तर लोकांना जागं करा, असं आवाहन ठाकरेंनी (Uddhav Thackeray) कार्यकर्त्यांना केलं. स्वतःवर आलं की हे लोक असं काही पिल्लू सोडतात, की आपण एकमेकांत भांडायला लागतो. त्यापासून सावध होण्याची गरज असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com