Babanrao Pachpute : ॲम्ब्यूलन्स फसली, पण तेव्हा त्यात माजी मंत्री बबनराव पाचपुते नव्हते...

Ambulance : अधिवेशन सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच चेंबरचे झाकण तुटलेले होते.
Babanrao Pachpute
Babanrao PachputeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Winter Session : राज्याचे (Maharashta) माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांना अस्थमाचा त्रास जाणवू लागल्यावर त्यांना विधानभवन परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून त्यांना खासगी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. ज्या ॲम्ब्यूलन्समधून त्यांना नेण्यात आले, परत येताना ती ॲम्ब्यूलन्स विधानसभेच्या अगदी समोर असलेल्या गटाराच्या एका चेंबरमध्ये फसली. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता.

विधानसभेच्या इमारतीच्या अगदी समोर एक चेंबर आहे. अधिवेशन (Assembly Winter Session) सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच चेंबरचे झाकण तुटलेले होते. पण त्याकडे कुणी लक्ष दिले नाही. किमान झाकून ठेवता आले असते किंवा जाळी तरी ठेवता येऊ शकली असती. पण तसे काहीही करण्यात आले नाही. परिणामी आज त्या चेंबरमध्ये ॲम्ब्यूलन्स फसली. त्यानंतर तेथे लगेच दुसरे झाकण ठेऊन त्यावर फुलांचे रोपटे ठेवण्यात आले. जेणेकरून कोणतेही वाहन त्यावरून जाऊ नये.

राज्यातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा दर्जा उंचाविण्यासाठी विधानसभेत प्रश्न मांडण्यात येतात. मात्र विधानभवन परिसरातच निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्यामुळे माजी आमदार पाचपुतेंना रुग्णालयात सोडून आल्यानंतर रुग्णवाहिकेचे चाक विधानभवन परिसरातील चेंबरमध्ये फसले. ही रुग्णवाहिका माजी मंत्र्यांना खासगी रुग्णालयात सोडून आली होती. मात्र त्यांना सोडण्यासाठी जाताना ही घटना घडली असती तर काय? घडणाऱ्या घटनेची जबाबदारी कोणी स्विकारली असती असा प्रश्न उपस्थित झाला.

नागपूरात कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांनंतर हिवाळी अधिवेशन होत आहे. राज्यभरातून येणारे मंत्री- आमदार आणि कर्मचाऱ्यांना सुविधा देण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र निकृष्ट दर्जाचे काम केल्याने आमदाराच्या जीवावर बेतले असते. महाराष्ट्राचे माजी मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार बबनराव पाचपुते यांना अस्थमाचा त्रास आहे. त्यांना श्वास घेण्यात अडचणी येत असल्याने त्यांना विधानभवन परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांना दाखवले. डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्याचे सूचविले. त्यानंतर त्यांना नागपुरातील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र त्यांना खासगी रुग्णालयात सोडून आल्यानंतर विधानभवन परिसरात रुग्णवाहिकेचे चाक विधानभवनासमोरच असलेल्या चेंबरमध्ये फसले.

Babanrao Pachpute
बबनराव पाचपुते म्हणाले, 'साईकृपा'वर आता गडकरींचा वरदहस्त

कालच करण्यात आली होती चेंबरची दुरुस्ती..

विधानभवन समोर असलेल्या चेंबरचे झाकण अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच तुटलेले होते. त्यानंतर बुधवारी अधिवेशनाचे सत्र संपल्यानंतर सायंकाळी चेंबरवर फ्रेम आणि त्याचे झाकण अलगत ठेवण्यात आले होते. आज दुपारी याच चेंबरवर रुग्णवाहिकेचे चाक फसले. त्यानंतर लगेच उपाययोजना करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com