एसडीओंना वाचवायला गेलेला API सुद्धा जखमी, भंडारा पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष..

भंडारा जिल्ह्यातील वाळूला विदर्भात मोठी मागणी आहे. तर पवनी तालुक्यातील वाळू घाट लिलावात गेले नसले तरी वाळू माफिया (Sand Mafiya) राजरोसपणे वाळूची अवैध वाहतूक करीत आहेत.
Sand Mafiya Bhandara
Sand Mafiya BhandaraSarkarnama

भंडारा : कारवाईसाठी गेलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या (एसडीओ) पथकावर वाळू तस्करांनी हल्ला केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील बेटाळा येथे काल पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास घडली. यात एसडीओ जखमी झाले आहेत. त्यांच्या वाहनाच्या काचाही फोडण्यात आल्या आहे. एसडीओंना वाचवायला गेलेला एपीआईसुद्धा जखमी झाला असून आता या प्रकरणी पवनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील वाळूला विदर्भात मोठी मागणी आहे. तर पवनी तालुक्यातील वाळू घाट लिलावात गेले नसले तरी वाळू माफिया (Sand Mafiya) राजरोसपणे वाळूची अवैध वाहतूक करीत आहेत. भंडाराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्याकडे वाळू तस्करीच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून बुधवारी पहाटे ते तलाठी, पोलीस कर्मचारी असलेल्या पथकासह पवनी निलज रस्त्यावर वाहनाने गेले. पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास वाळूचे चार-पाच टिप्पर एकापाठोपाठ येताना दिसले असता टिप्परला थांबविण्याचा इशारा केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.

काही अंतरावर बेटाळाजवळ टिप्पर अडविला गेला. काही कळायच्या आता 20 ते 25 तस्करांनी हातात काठ्या, फावडे व दगडं घेऊन त्यांच्यावर हल्ला केला. यात उपविभागीय अधिकारी राठोड जखमी झाले. वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. . या प्रकाराची माहिती पवनी पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते, यात वाळू माफियांची मुजोरी इतकी की एसडीओंना वाचवायला गेलेले एपीआय राउतसुद्धा जखमी झाले. लागलीच पवनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. यातील 9 आरोपींची ओळख पटली असून आरोपींना पकडण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे.

Sand Mafiya Bhandara
तहसिलदार सचिन लंगोटे यांना खाली पाडून जबर मारहाण; आटपाडीत वाळू तस्कर माजले! 

विशेष बाब म्हणजे पवनीच्या तहसीलदारांनी काही दिवसांपूर्वी असाच एक वाळूचा ट्रक पकडला होता. त्यावेळेला पोलिस उपस्थित असतानासुद्धा वाळू माफियांनी दमदाटी दिली होती. तेव्हाच वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या असत्या तर आज ही घटना घडली नसती, पण आज झालेल्या घटनेमुळे महसूल अधिकारी व पोलीस अधिकारी यांनाच वाळू माफियांनी शह दिल्याने आज त्यांची दादागिरी वाढली असल्याचे दिसून येत आहे. वाळू माफियांना राजकारणी लोकांचा वरदहस्त असल्याने आज त्यांची दादागिरी वाढली असल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com