MLA Kishor Jorgewar News : चंद्रपूरच्या दीक्षाभूमीचा विकास करण्यात यावा, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी सातत्याने लावून धरली होती. काल पार पडलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातही आमदार जोरगेवार यांनी सदर मागणीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावर उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूरच्या दीक्षाभूमीचा विकास केला जाईल, असे आश्वासन सभागृहात दिले आहे.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी पूर्व विदर्भातील नागपूर (Nagpur) आणि चंद्रपूर (Chandrapur) केवळ या दोन ठिकाणी दीक्षा दिली. नागपूर दीक्षाभूमीचा विकास झाला. मात्र चंद्रपूर येथील दीक्षाभूमी उपेक्षीत राहिली. त्यामुळे या पवित्र दीक्षाभूमीचा विकास करण्यासाठी आमदार जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मुंबई येथे झालेल्या पहिल्याच अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) यांनी चंद्रपूरच्या दीक्षाभूमीच्या सर्वसमावेशक विकासासाठी एकत्रित १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी सातत्याने या मागणीचा पाठपुरावा केला.
चंद्रपुरातील दीक्षाभूमीचा विकास व्हावा, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागणी केली होती. १६ ऑक्टोबरला भव्य कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते. मात्र येथे सोयी सुविधांचा अभाव असल्याने येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होते. त्यामुळे नागपूर दीक्षाभूमीच्या धर्तीवर चंद्रपूर येथील दिक्षाभूमीचाही विकास करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी संबंधित मंत्र्यांना केली होती. या कामाचा आराखडा तयार करून तो शासनाकडे पाठविण्यात आला आहे. येथे भव्य संविधान भवन निर्माण करावे अशी त्यांची मागणी आहे.
दरम्यान नागपूर येथे काल पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात २९३ अन्वये बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी पुन्हा एकदा हा विषय मांडत चंद्रपूर येथील दीक्षाभूमीच्या विकासासाठी मोठा निधी देण्याची मागणी करत सदर विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. काल यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांचे दीक्षाभूमीच्या विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी वारंवार ही मागणी केली आहे. या दीक्षाभूमीचा विकास केला जाईल. येथे सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला सांगितले. मुख्यमंत्री यांनी स्वत: दखल घेतल्याने चंद्रपूरच्या दीक्षाभूमीचा विकास वेगाने होणार, अशी आशा निर्माण झाली आहे. या अगोदर आमदार किशोर जोरगेवार यांनी येथे अभ्यासिकेसाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.