महाविकास आघाडी सरकारने फक्त भ्रष्टाचार करून आपली पोळी शेकली !

अशा समाजकंटकांविरूद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे, यासाठी पोलिस आयुक्तांना भेटणार आहे, असे बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले.
Chandrashekhar Bawankule at Amravati.
Chandrashekhar Bawankule at Amravati.Sarkarnama

नागपूर : मागच्या अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडी सरकारने मंत्र्यांकरिता काम केले. अनाचार, भ्रष्टाचार, दुराचार करून फक्त आपली पोळी शेकली. रस्ते, वीज, पाणी या जनतेच्या मुलभूत गरजा आहेत. मागे देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ही कामे मोठ्या प्रमाणात झाली. आताही आम्ही या कामांना प्राथमिकता देऊ, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

भाजपच्या (BJP) प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अमरावती (Amravati) येथे ते पत्रकारांशी बोलत होते. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशातील १३० कोटी जनतेला हाक दिली. हा महोत्सव केवळ सरकारी होऊ नये, तर जनतेचा व्हावा म्हणून ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’, हा उपक्रम राबविला आणि देशातील जनतेने त्यांना मोठा प्रतिसाद दिला. देशभर जनतेने मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. पण अमरावती शहरात मात्र काही समाजकंटकांनी या उपक्रमाच्या बॅनर, पोस्टरसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. बॅनरवरचा तिरंगा फाडण्याचं काम करण्यात आलं आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. अशा समाजकंटकांविरूद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे, यासाठी पोलिस आयुक्तांना भेटणार आहे, असे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

शेतकऱ्यांना चुकीचे अवाढव्य बिले देऊन वीज कनेक्शन कापण्याचे पाप यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरविले आहे की, शेतकऱ्यांना दिवसा वीज देणयाकरिता मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेच्या माध्यमातून ४५ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे. १ -२ वर्षांत हे काम होणार नाही, तर पुढच्या पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कुठलाही भुर्दंड पडणार नाही, अशी योजना आम्ही राबविणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. मी ऊर्जमंत्री असताना वीज कंपनीचा कुठलाही कर्मचारी शेतकऱ्यांच्या शेतात वीज कापण्यासाठी गेला नाही, असेही त्यांनी सांगितले.

Chandrashekhar Bawankule at Amravati.
२०१९ मध्ये पक्षाने तिकीट कापलेले चंद्रशेखर बावनकुळे २०२४ मध्ये वाटणार तिकीटं...

महाराष्ट्रातल्या ९७ हजार ३४० बुथवर भारतीय जनता पक्षाचे काम करणारे ३० लढवय्ये कार्यकर्ते बुथ सक्षमीकरण अभियानाच्या माध्यमातून तयार करणार आहोत. २५ लाख युवा वॉरिअर्स पंतप्रधान नरेंद्र मोदी, देश व समाजाकरिता काम करणारे आम्ही तयार करणार आहोत. या वॉरिअर्सच्या माध्यमातून समाज रक्षणाचं, देश रक्षणाचं काम भारतीय जनता पक्ष करणार आहे. सोबत सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक कार्य केले जाणार आहे, असे आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com