‘चिठ्ठी ना कोई संदेस’ म्हणत सदस्य कार्यशाळेकडे फिरकले नाहीत…

ताडाळी- पडोली क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य रणजीत सोयाम, Ranjeet Soyam जुनासुर्ला-बेंबाळ क्षेत्राच्या सदस्य शीतल बांबोळे Sheetal Bambole यांना कार्यशाळेची माहितीच देण्यात आली नाही.
Chandrapur ZP
Chandrapur ZPSarkarnama
Published on
Updated on

चंद्रपूर : गाव विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची कार्यशाळा जिल्हा परिषदेने आयोजित केली होती. यामध्ये सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. तसे पत्र, संदेश पंचायत विभागाने सदस्यांना पाठविले होते. पण काही सदस्यांनी सांगितले की, याची माहितीच मिळाली नाही. त्यामुळे ‘चिठ्ठी न कोई संदेस...’, असे म्हणत बहुसंख्य सदस्यांनी या कार्यशाळेकडे पाठ फिरविली.

या कार्यशाळेबाबत सगळ्याच सदस्यांना माहिती देण्यात आल्याचे पंचायत विभाग सांगत आहे. मात्र, काही सदस्यांना माहितीच देण्यात आली नाही. त्यांनी कार्यशाळेबाबत पाठविलेले पत्रही मिळाले नाही. ताडाळी- पडोली क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य रणजीत सोयाम, जुनासुर्ला-बेंबाळ क्षेत्राच्या सदस्य शीतल बांबोळे यांना कार्यशाळेची माहितीच देण्यात आली नाही. रणजीत सोयाम मंगळवारी जिल्हा परिषदेतच हजर होते. त्यांनी कार्यशाळेची माहिती मिळाली नसल्याचे ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सदस्यांसाठी गाव विकासाच्या अनुषंगाने आज हॅाटेल एनडी येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ग्रामपंचायत विकास आराखड्यासंबंधाने या कार्यशाळेत यशदाचे प्रशिक्षणार्थी मार्गदर्शन करणार होते. महत्त्वाच्या या प्रशिक्षण कार्यशाळेला अनेक सदस्यांनी पाठ फिरविली. काही जिल्हा परिषद सदस्यांना या कार्यशाळेची अधिकृत माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्या सदस्यांनी माहिती असतानाही कार्यशाळेला येणे टाळले.

राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानाअंतर्गत ‘आमचं गाव आमचा विकास’ हा कार्यक्रम राज्य शासनाच्या माध्यमातून राबविला जात आहे. या उपक्रमाची माहिती जिल्हा परिषद सदस्यांना व्हावी, यासाठी कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना शासनाच्या आहेत. पंचायत विभागावर या कार्यशाळेची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्या अनुशंगाने पंचायत विभागाने या कार्यशाळेची माहिती जिल्हा परिषद सदस्यांना दिली. यासाठी त्यांचा व्हॉटसअॅप ग्रुप, घरच्या पत्त्यावर पत्र आणि बीडीओंच्या माध्यमातूनही त्यांना माहिती देण्याचे नियोजन केले होते. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद सदस्यांना कार्यशाळेची माहिती देण्याचे काम सुरू होते.

Chandrapur ZP
जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस दिसली केदारांच्या छायेत...

सगळ्यांना पत्र, निरोप देण्यात आले. त्यामुळे कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, अशी आशा पंचायत विभागाला होती. मात्र, झाले उलटे. केवळ ३३ सदस्यांनी या कार्यशाळेला हजेरी लावली होती. जवळपास बावीस सदस्यांनी गाव विकासाच्या या महत्त्वाच्या कार्यशाळेला बुट्टी मारली.काही सदस्य महत्त्वाचे काम असल्याचे कारण समोर करून अर्ध्यातूनच बाहेर पडले, तर काही जणांनी बैठक असल्याचे कारण समोर करून कार्यशाळेतून काढता पाय घेतला. गाव विकासाच्या दृष्टीने ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वाची होती. असे असतानाही सदस्यांनी पाठ दाखविली. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या कार्यशाळेत जिल्हा परिषद, पंचायत समिती विकास नियोजनाच्या एकत्रीकरणासाठी महत्त्वाचे कार्यक्रम, क्षेत्रे, बीपीडीपी, डीपीडीपी आराखडा तयार करणे यांसह अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली.

कार्यशाळेची माहिती जिल्हा परिषद सदस्यांच्या व्हॉटसॲप ग्रुपवर टाकण्यात आली होती. सगळ्याच सदस्यांना घरच्या पत्त्यांवर पत्रही पाठविण्यात आले होते. बीडीओंनाही कार्यशाळेची माहिती देण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.

- कपिल कलोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत विभाग) जि.प. चंद्रपूर.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com