मिलिंद तेलतुंबडेसह ठार झालेल्या नक्षलवाद्यांची नावे आली समोर

'सी-60' (C-60) पथकाच्या जवानांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.
Naxalwadi
NaxalwadiSarkarnama

पुणे : महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेलगत कोटगुल - ग्यारापत्ती जंगल परिसरात 'सी-60' पोलिसांशी झालेल्या चकमकीत शनिवारी (ता.13 नोव्हेंबर) 26 नक्षलवादी ठार (Naxalwadi Killed) झाले. सुमारे 4 तास चाललेल्या या चकमकीत जहाल नक्षलवादी नेता मिलिंद तेलतुंबडेदेखील (Milind Teltumde) ठार झाला आहे. गडचिरोलीत नक्षलविरोधी कारवाईत गडचिरोली पोलिसांना (Gadchiroli Police) मोठे यश मिळाले आहे. तेलतुंबडेसह ठार झालेल्या नक्षलवाद्यांची नावे आली समोर आले आहेत.

Naxalwadi
पोलिस शोधताहेत मालेगाव दंगलीतील `कुत्ता गोली` आणि राजकारणाचे कनेक्शन!

या नक्षलविरोधी कारवाईत चकमकीत तीन पोलीस गंभीर जखमी झाले असून त्यांना हेलिकॉप्टरने नागपूर येथे हलवण्यात आले आहे. काल ही कारवाई झाल्यानंतर ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू होते. तेलतुंबडेसह ठार झालेल्या काही नक्षलवाद्यांच्या नावांची यादी आता समोर आली आहे. कोरची तालुक्यातील मरदिनटोला जंगलात गडचिरोली पोलिसांच्या 'सी-60' पथकाच्या जवानांनी शनिवारी कोम्बिंग ऑपरेशन राबवत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.

Naxalwadi
`महाराष्ट्रात आता कोणत्याही क्षणी आणीबाणी लागू होईल`

चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे नावे, पद व त्यांच्यावर ठेवलेला इनाम

अडमा पोडयाम - गंगलुर एरीया (छ.ग.), बंडू ऊर्फ दलसू राजु गोटा (रा. गोरगुट्टा, ता. एटापल्ली, जि. गड) इनाम 4 लाख रुपये , प्रमोद ऊर्फ दलपत लालसाय कचसामी (रा. वडगाव, ता. कोरची, जि. गड) इनाम 4 लाख रुपये, कोसा ऊर्फ मुसाखी (बस्तर एरीया, (छ.ग.)) इनाम 4 लाख रुपये, निरो (दक्षिण माड एरीया) (छ.ग.) चेतन पदा (दक्षिण बस्तर (छ.ग.)) इनाम 2 लाख रुपये, विमला ऊर्फ ईमला ऊर्फ कमला ऊर्फ मान्सो सुखराम बोगा (रा. गजामेंढी, ता. धानोरा, जि. गडचिरोली) इनाम 4 लाख रुपये, किशन ऊर्फ जैमन (रा दरभा एरिया (छ.ग)) इनाम 8 लाख रुपये, जिवा ऊर्फ दिपक ऊर्फ मिलींद तेलतुंबडे (रा राजुर ता.वणी जि. यवतमाळ) इनाम 50 लाख रुपये, महेश उर्फ शिवाजी रावजी गोटा, (रा. रेगडीगुट्टा, गडचिरोली, डिव्हीसीएम कसनसुर दलम, एके -47) इनाम 16 लाख रुपये, भगतसिंग ऊर्फ प्रदिप ऊर्फ तिलक मानकुर जाडे (रा. खसोडा, गडचिरोली, एसीएम बॉडीगार्ड (मिलींद तेलतुंबडे)) इनाम 6 लाख रुपये, सन्नू ऊर्फ कोवाची, (रा. बस्तर एरीया, छत्तीसगड, कमांडर कसनसुर दलम, एके- 47) इनाम 8 लाख रुपये, प्रकाश ऊर्फ साधू सोनू बोगा, (रा. संबलपूर, गडचिरोली, पिएम, कंपनी नं 4, एसएलआर) इनाम 4 लाख रुपये, लच्छु, (रा. बस्तर एरिया, छत्तीसगड, पिएम कंपनी नं.4 बॉडीगार्ड प्रभाकर, 12 बोर) इनाम 4 लाख रुपये, नवलुराम ऊर्फ दिलीप हिरुराम तुलावी, (रा. गजमेंढी, गडचिरोली, पिपिसीएम कंपनी नं 4, एसएलआर व 9 एमएम पिस्टल) इनाम 4 लाख रुपये, लोकेश ऊर्फ मंगू पोड्याम, मडकाम, (रा. जागरगुंडा, दंतेवाडा,छत्तीसगड, डिव्हीसीएम व कमांडर कंपनी नं 4, एके -47,9 एमएम पिस्टल व युबीजिएल सेल) इनाम 20 लाख रुपये,

या कारवाईत ठार झालेल्या 26 नक्षलवाद्यांमध्ये चार महिला नक्षली, सहा पुरुष नक्षवाद्यांचा समावेश आहे. यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com