अबुधाबीतून आलेल्या ‘त्या’ दोघांनी वाढविले भंडारा जिल्ह्याचे टेंशन…

केंद्र सरकारकडून (Central Government) नवीन कोरोना मार्गदर्शिका (New Corona Guidelines) आली आहे आणि राज्य सरकारही आवश्‍यक ती खबरदारी बाळगत आहे.
Omicron
Omicron Sarkarnama
Published on
Updated on

भंडारा : मुंबई, पुणे (Mumbai and Pune) येथे विदेशातून काही जण आल्यामुळे महाराष्ट्रातील लोक सतर्क झाले आहे. त्यानंतर सर्वत्र खबरदारी घेणे सुरू झाले आहे. आत्ता आत्तापर्यंत ओमिक्रॉमच्या (Omicron) रुग्णांची नोंद नाही. पण काल अबुधाबीतून भंडारा जिल्ह्यात (Bhandara District) आलेल्या दोन व्यक्तींनी जिल्हावासीयांचे टेंशन वाढविले आहे.

दोघे जण काल अबुधाबीतून मोहाडी आणि तुमसर तालुक्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने या दोघांनाही गृह विलगीकरणात ठेवले आहे आणि त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यात येते आहे. या लोकांच्या जिल्ह्यात येण्याने जिल्हा प्रशासनाची झोप उडविली आहे. ओमिक्रॉम नावाचा कोरोनाचा वेरीअंट दक्षिण आफ्रिकेत आढळला आहे. इतर देशांप्रमाणे आता भारतातही त्याची दहशत पसरू लागली आहे. केंद्र सरकारकडून नवीन कोरोना मार्गदर्शिका आली आहे आणि राज्य सरकारही आवश्‍यक ती खबरदारी बाळगत आहे.

राज्य शासनाने सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याचे दिशानिर्देश दिलेले आहेत. विदेशातून भंडारा जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले असून दर दोन तासांनी त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे. सात दिवसांत त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे. प्रशासनावर ताण वाढला आहे. जिल्ह्यात सद्यःस्थितीत कोरोनाचा एक रुग्ण क्रियाशील आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने केलेला मोठा विध्वंस बघता प्रशासन सतर्क झाले असून ॲक्शन मोडवर आले आहे. जिल्ह्यात आता पर्यंत 60 हजार 106 कोरोना रुग्ण आढळले असून 58 हजार 972 कोरोना मुक्त झाले आहेत. तर 1133 रुग्णाच्या बळी गेला आहे. त्यामुळे मागील दोन लाटांच्या अनुभव बघता जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे.

मनुष्यबळ नसल्याचा फटका बसणार?

भंडारा जिल्ह्यात आरोग्य विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने तिसरी लाट आली तर प्रशासन त्याचा मुकाबला करू शकणार नाही, असे बोलले जात आहे. भंडारा जिल्ह्यात पहिल्या दोन लाटांमध्ये ६०१०६ सक्रिय रुग्ण आढळले होते आणि ११३३ लोकांचा बळी गेला होता. जिल्ह्यात पहिल्या दोन लाटांनी इतका हाहाकार माजविला होता की ॲडव्हान्स सरण रचण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली होती. तेव्हा आरोग्य विभागाचे अक्षरक्ष: धिंडवडे निघाले होते.

Omicron
सातशे शेतकऱ्यांच्या मृत्यूची नोंद नाही, मग लाखो कोरोना बळींचा आकडा कसा मिळवला?

हे सर्व लक्षात घेता आरोग्य विभाग सक्षम करण्यावर भर दिला गेला असला दक्षिण आफ्रिकेतील नवीन ओमिक्रॉन नावाच्या नवा कोरोना वेरिअंट राज्यात आला आहे. तरीही राज्य सरकार गंभीर नसल्याचे चित्र दिसत आहे. भंडारा जिल्ह्यात तब्बल २१६ पदे रिक्त असून यात गट अ पासून इतर पदांचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी गट अ ची २४ पदे, वैद्यकीय अधिकारी गट ब ची ६ पदे, आरोग्य सेवक पुरुष ६३, आरोग्य साहाय्यक २, आरोग्य सेविका १०८, आरोग्य सहायिका ६, आरोग्य पर्यवेक्षक २, आरोग्य पर्यवेक्षक पुरुष १, औषधी निर्माण अधिकारी ४, अशी एकूण २१६ पदे रिक्त आहेत.

यात धक्कादायक बाब अशी की, अद्यापही आरोग्य विभागातील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. मात्र भंडारा जिल्हा प्रशासनाने कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात काही पदे भरून मलम लावण्याचा प्रयत्न केला आहे. पण ओमिक्रॉनचे आक्रमण झाल्यास ही थातूरमातूर उपाययोजना कामी येणार नाही. पुन्हा लोकांच्या जिवाशी प्रशासन खेळणार आहे का, असा सवाल विचारला जात आहे. शासनाने रिक्त पदे त्वरित भरून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com