Wadettiwar on Sharad Pawar : शरद पवारांबाबत संशय वाटत नाही, ‘इंडिया’त फूट पडेल, अशी वक्तव्ये कुणी करू नये !

Ajit Pawar : अजित पवार परत येणार, पण यावर आता घाईने बोलणे योग्य नाही.
Vijay Wadettiwar and Sharad Pawar
Vijay Wadettiwar and Sharad PawarSarkarnama

Maharashtra Politics News : काही पक्षांचे नेते शरद पवारांबाबत संशय निर्माण होईल, अशी वक्तव्ये करीत आहेत. पण मला शरद पवारांबाबत अजिबात संशय वाटत नाही आणि ‘इंडिया’ हे मजबूत संघटन झालेले आहे. त्यात फूट पडेल, अशी वक्तव्ये कुणी करू नये, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. (I have no doubts about Sharad Pawar at all)

अजित पवारांच्या बाबतीतही असाच प्रकार सुरू आहे. पण अजित पवार कुणासोबत आहेत, याचे उत्तर येणाऱ्या काळात मिळेल आणि तो ‘काळ’ कुणासाठी ठरेल, हेसुद्धा लवकरच कळणार आहे, असे म्हणत वडेट्टीवार यांनी विरोधकांना इशारा दिला. अजित पवार परत येणार, पण यावर आता घाईने बोलणे योग्य नाही. अजित पवारांना सोबत घेऊन भाजपवर पश्चात्ताप करण्याची वेळ येणार आहे.

शरद पवार - अजित पवार भेटीबाबत वडेट्टीवार म्हणाले, अनेक व्यवसाय आणि संस्थांमध्ये दोघे भागीदार असू शकतात. त्याबाबतही त्यांच्या भेटीच चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. सध्याच या भेटीचे वेगळे अर्थ काढण्याची गरज नाही. कुणी कुठेही गेले, तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मतदार हा शरद पवारांच्याच पाठीशी आहे.

भाजपने कंबरेला गुंडाळले आहे. त्यांच्या नीतिमत्तेवर बोलण्यात काही अर्थ नाही. उद्धव ठाकरे जे बोलले ते सत्य आहे. भाजप आणि नीतिमत्ता यांचा दुरान्वयेही संबंध राहिलेला नाही, असेही ते म्हणाले.

Vijay Wadettiwar and Sharad Pawar
Vijay Wadettiwar On Talathi Exam : बेरोजगार तरुणांची सरकार थट्टा करतेय; तलाठी परीक्षेत गोंधळ, विजय वडेट्टीवर आक्रमक

२१ दिवस सलग पाऊस नसेल तर दुष्काळ जाहीर करून पीक विमा घोषित केला पाहिजे, हे SRDF चे निकष आहेत. याची माहिती कृषी आयुक्तांकडे उपलब्ध आहे. असे असतानाही अजूनही सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही. याला सरकारचे दुर्लक्ष नाही, तर आणखी काय म्हणावे. आज कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. नाथसागर मध्ये ३४ टक्के पाणीसाठा आहे. मराठवाडा दुष्काळाच्या सावटाखाली आहे. पण सरकार झोपेत आहे की झोपेचे सोंग घेतले आहे, अशी टीका त्यांनी केली.

देशाच्या (India) इतिहासात कांद्याच्या निर्यातीवर पहिल्यांदा ४० टक्के दर लावण्याचा निर्णय घेतला. आता दररोज एक लाख टन कांदा मार्केटमध्ये येतो. दोन लाख टन कांदा दोन दिवसांत खरेदी होईल. मग शेतकऱ्यांनी काय करायचे? सरकार शेतकऱ्यांना अडकवून ठेवत आहे. शेतकऱ्याला न्याय देण्याची सरकारची भूमिका नाही. उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा करण्यासंबंधी निर्णय घेतला होता. नाफेडच्या खरेदीचा शेतकऱ्याला उपयोग होणार नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar and Sharad Pawar
Vijay Wadettiwar यांनीBJPला सुनावले, बघा इतके का भडकले? | BJP |Bagalkot Shivaji Maharaj | Sarkarnama

होम हवन आदींवर विश्वास ठेवणाऱ्यांकडे वैज्ञानिक दृष्टिकोन नाही. ‘हे’ त्यांचे यश आहे, असे त्यांनी समजू नये. कारण हा पाय पंडित जवाहरलाल नेहरूंनी रचला होता. देशात सुई नव्हती, तेव्हा इस्रो उभे झाले. अवकाश संशोधन झाले. हे सर्व नेहरू केले इंदिरा गांधींनी केले. फाउंडेशन आम्ही केलेले आहे अन् आता काही लोक म्हणतात घर आम्ही बांधतो, याला काही अर्थ नाही, असे म्हणत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com