नागपूर : नाशिक (Nasik) जिल्ह्यातील आमदार सुहास कांदे यांनी महाराष्ट्र सदनातील भ्रष्टाचाराचा मुद्दा आज सभागृहात जोरकसपणे लावून धरला. यावेळी ते चांगलेच आक्रमक झाले होते. भ्रष्टाचाऱ्यांवर इतकं प्रेम का, असे म्हणत उपमुख्यमंत्री भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला.
भ्रष्टाचाऱ्यांना अजिबात पाठीशी घातले जाणार नाही, असे उत्तर आमदार कांदेंच्या (MLA Suhas Kande) प्रश्नावर देताना उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले, यासंदर्भात दोन जीआर रद्द करण्यात आले असल्याचे आपले म्हणणे आहे. पण अपील करायची की नाही, याचा निर्णय डिपार्टमेंट घेत असते. मंत्र्यांकडे हा विषय जात नाही. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे पाठवण्यात आले होते. त्यांनी त्यांची नोंद करण्याऐवजी रिमार्क दिला. मतभिन्नता असल्यामुळे महाअधिवक्तांचा अभिप्राय घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली. त्यानंतर मग ते दोन जीआरला स्टे दिला गेला.
ते दोन जीआर एडव्होकेट जनरलकडे पाठवण्यात आले. पण ते या प्रकरणात उभे होते. म्हणून त्यांनी रिटायर्ड जस्टीस वर्मांचे मत यावर घेतले आणि त्यांनी दिलेले मत, हेच माझे मत असल्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ठाकरेंनी आदेश दिले आणि त्यानुसार ते दोन्ही जीआर रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे कुणी दबावात काम केल्याचे दिसत नाही. या प्रकरणात गंभीर परिस्थितीत आपण आहो. त्यामुळे आता पुन्हा काही कारवाई करता येते का, हे पडताळून पाहावे लागेल. मागणी पडताळून पाहण्यात येईल. चूक झाली असेल, तर अपिलात जाण्याची आवश्यकता होईल. तेव्हा आपण अपिलात जाऊ आणि या संदर्भात शासन योग्य ती कारवाई करेल, असे फडणवीस म्हणाले.
तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ही फाईल बंद केली आहे. त्यामुळे कायदेशीर बाबी तपासून बघाव्या लागतील. भ्रष्टाचार झाला असेल तर कुणालाही पाठीशी घातले जाणार नाहीत. देशाचे सॉलिसिटर जनरल यांचेही मत यामध्ये घेतले जाईल. त्यांनी जर असे म्हटले की अपिलात गेले पाहिजे, तर आपण नक्की जाऊ. आमदार सुहास कांदे यांच्या मताची मी गंभीर नोंद घेतली आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.