Yavatmal Politics : मिशीवर ताव देत नेत्याचं 'तांडव'; लोणच्याची बरणी अन् लाथाबुक्क्यांनी मारहाण

Political News: लोकप्रतिनिधीने एकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची चर्चा यवतमाळच्या राजकीय वर्तुळात आहे.
Politics
PoliticsSarkarnama
Published on
Updated on

सतीष येटरे :

Yavatmal News: मिशीवर ताव देणारा एक बडा लोकप्रतिनिधी नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहतो. घटनेनंतर त्याचे किस्से चर्चेचा विषय असतात. असेच त्याचे दोन किस्से अलीकडेच पुढे आले आहेत. एका मानद सहकाऱ्याला त्याने मुंबईत थेट लोणच्याची बरणी फेकून मारली. त्यामुळे तो जखमी झाला होता, तर दुसऱ्याला परराज्यात लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची जोरदार चर्चा यवतमाळच्या राजकीय वर्तुळात आहे.

तडजोड झाल्याने ही दोन्ही प्रकरणे चव्हाट्यावर आली नसल्याचे बोलले जाते. कुठलाही लोकप्रतिनिधी असला की, त्याला 'ऑफ द रेकॉर्ड ' आचारसंहिता लागू होते. पण राजकीय पुढारी आणि त्यातही लोकप्रतिनिधी असल्याचा अहंकार डोक्यात घुसला की त्याचे काही खरे नसते. नेमकं हाच अहंकार डोक्यात घुसलेला एक लोकप्रतिनिधी सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

Politics
Nashik Onion Issue: कांद्याच्या प्रश्नात दोन्ही पवारांची उडी; अजितदादांची बैठक तर शरद पवारांची 'ही' मागणी

काही दिवसांपूर्वी मिशीवर ताव देणारा ‘तो’ लोकप्रतिनिधी परराज्यात गेला होता. या वेळी तो एका खासगी स्वीय सहायकाला सोबत घेऊन गेला होता. एके दिवशी सहकाऱ्याच्या खिशातील पैसे संपले. त्यामुळे त्याने लोकप्रतिनिधीला पैशाची मागणी केली. शिवाय तीन महिन्यांचे वेतन थकीत असल्याने त्याने ते वेतन मागितले. मात्र, रात्रीची वेळ आणि त्यातही लोकप्रतिनिधी 'तंद्रीत' असल्याने वाद वाढला.

एवढेच नव्हे तर संतापाच्या भरात 'त्या' लोकप्रतिनिधीने सहकाऱ्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याला दुखापत झाली. मात्र, त्या सहकाऱ्याला एका लोकप्रतिनिधीने समजूत घालून आणि काही पैसे देत गावाकडे पाठविले. त्यानेही समजूतदारीने घेत पोलिसांत तक्रार केली नाही. पण त्याने संबंध संपुष्टात आणल्याचे बोलले जात आहे. तत्पूर्वी त्याच लोकप्रतिनिधीने मुंबई स्थित सीएसटी परिसरातील 'शेरे पंजाब'मध्येही एक कारनामा केल्याची माहिती सूत्र देतात.

Politics
Mantralaya News : मंत्रालयातील आत्महत्येचे प्रयत्न अन् लाच देण्याच्या घटनांवर सरकारचा जालीम उपाय

रात्रीच्या वेळी 'तंद्रीत' असताना नमस्कार न केल्याने एका मानद सहकाऱ्याला लोणच्याची बरणी फेकून मारली. या मारहाणीत त्या सहकाऱ्याच्या नाकाला गंभीर दुखापत झाली होती. त्यावेळी त्या सहकाऱ्यासोबत असलेले त्याचे दोन भाचे त्या लोकप्रतिनिधीच्या अंगावर चालून गेले होते. पण त्यावेळी एका सहकारी लोकप्रतिनिधीने आणि 'शेरे पंजाब'च्या मालकाने समेट घडविल्याने अनर्थ टळल्याची चर्चा यवतमाळच्या राजकीय वर्तुळात आहे.

शिस्तीच्या धड्यांचा विसर नेमका पडतो कुठे ?

काही विशिष्ट पक्ष लोकप्रतिनिधींनी चाकोरी बाहेर जाऊ नये, शिवाय पक्षाची बदनामी होऊ नये, यासाठी शिस्तीचे धडे देतात. पण लोकप्रतिनिधी झाल्यानंतर डोक्यात शिरलेली हवा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यातूनच रात्री सुस्थितीत नसताना आपण काही जगावेगळे आहोत या अविर्भावात ते वागतात. त्यातूनच अशा घटना घडतात.

पक्षाने अथवा विशिष्ट संघटनेने दिलेल्या शिस्तीच्या धड्यांचा विसर नेमका पडतो कसा, असा प्रश्न आता या दोन्ही घटनांच्या चर्चेनंतर जनसामान्यांतून उपस्थित केला जात आहे. नव्हे तर या दोन्ही घटनांची चर्चा आता कर्णोपकर्णी आहे. शिवाय मिशीवर ताव देणारा तो लोकप्रतिनिधी तिरस्काराचा तेवढाच हास्याचा विषय बनला आहे.

Politics
OBC Reservation News : ओबीसी आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने ठाकरे गटातील नेत्यांबाबत नाराजी...

'येरे माझ्या मागल्या' ने झाले ‘काम भारी’

कुठल्याही पक्षात वर्षानुवर्षे अनेक कार्यकर्ते सतरंज्या उचलत असतात. पण जेव्हा त्यांच्या पात्रापर्यंत वाढणारा येतो. तेव्हाच नेमकी बुंदी संपते. शिवाय 'येरे माझ्या मागल्या' या म्हणीप्रमाणे ऐनवेळी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलत हितसंबंध असलेल्या नवख्यांना राजकीय समीकरण जुळवत पुढे केले जाते. त्यानंतर कितीही शिस्तीचे धडे दिले तरी त्याचा काही उपयोग नवख्यांना होत नाही. त्यातूनच 'काम भारी' होत असल्याची चर्चा या दोन घटनांनी होत आहे.

Politics
Mantralaya News : मंत्रालयातील आत्महत्येचे प्रयत्न अन् लाच देण्याच्या घटनांवर सरकारचा जालीम उपाय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com