स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला होणार होते मोठे आंदोलन, पण आमदार पटेलांनी केली मध्यस्थी...

Maharashtra Government : महाराष्ट्र शासन व वनविभाग हे रस्ते होऊ देत नाहीत.
Rajkumar Patel
Rajkumar PatelSarkarnama
Published on
Updated on

The road from Semadoh to Raipur-Hatru was badly damaged : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट म्हणजे सरकार दृष्टीने दुर्लक्षीत भाग. समस्या कुपोषणाची असो, शेतकऱ्यांची वा दवाखान्यांची यंत्रणेचे कायमच दुर्लक्ष होत आले आहे. आता रस्त्यासाठी सरपंच, उपसरपंच संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले होते. पण आमदार राजकुमार पटेल यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर संघटनेने आंदोलन स्थगित केले. (MLA Rajkumar Patel intervened)

चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह ते रायपूर-हातरू हा रस्ता अतिशय खराब झाला असून इतर रस्त्यांची अवस्थासुद्धा दयनीय आहे. त्यामुळे मेळघाटातील सरपंच व उपसरपंच संघटनेने उद्या, १४ ऑगस्टला आंदोलन करण्याचा इशारा दिला. आमदार राजकुमार पटेल यांनी संघटनेने आंदोलन करून नये, असे आवाहन करीत या प्रकरणात मध्यस्थी केली.

महाराष्ट्र शासन व वनविभाग हे रस्ते होऊ देत नाहीत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. सेमाडोह ते रायपूर-हातरू हा रस्ता वारंवार बंद होतो. या रस्त्यावरून वाहने चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

या विरोधात मेळघाटातील सरपंच, उपसरपंच संघटना तसेच सदस्यांनी १४ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आंदोलन करण्याचा इशारा दिला. या दिवशी सेमाडोह येथे या संघटनांमार्फत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र आमदार राजकुमार पटेल यांच्यामार्फत या संघटनांच्या प्रतिनिधींना पत्रव्यवहार करून निवेदन देऊन त्यांना विनंती केली.

Rajkumar Patel
Amravati Loksabha : कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना नाही चालणार बाहेरचा उमेदवार, निरीक्षकांना स्पष्टच सांगितले !

आपण आंदोलन करू नये, असे आवाहन आमदार पटेल यांनी पत्रातून करण्यात केले. यासंदर्भात मी आमदार (MLA) या नात्याने गेली तीन-चार वर्षे तालुकास्तरावरून तसेच जिल्हास्तरावरून तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यापर्यंत प्रयत्न केले आहेत. लवकरात लवकर वनविभागाच्या परवानगीची समस्या सुटणार आहे.

उद्या (ता. १४) मुख्य वनसंरक्षक कार्यालय, अमरावती (Amravati) येथे एक बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे १४ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याऐवजी याच दिवशी या बैठकीला संघटनेचे चार प्रतिनिधी पाठवावेत आणि यासंदर्भात आपण चर्चा करून ही समस्या सोडवू, असे आवाहनसुद्धा आमदार राजकुमार पटेल यांनी केले आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com