Ravikant Tupkar Join NCP? : तुपकर राष्ट्रवादीच्या वाटेवर? खडसे म्हणतात, " ते सर्वांना हवेहवेसे..."

Eknath Khadse News : शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे राज्य सरकारवर केली टीका
Eknath Shinde, Ravikant Tupkar
Eknath Shinde, Ravikant TupkarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आज बुलढाणा जिल्ह्यात एका बैठकीला गेले होते. त्यावेळी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्याशी त्यांनी बंददाराआड सुमारे तासभर चर्चा केली. त्यानंतर खडसेंनी तुपकारांचे कौतुकही केले. यामुळे तुपकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चांना उधाण आले आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण ढवळले आहे. अनेक बडे नेते सोयीनुसार एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. अशा घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज तुपकर आणि खडसे यांच्यात दीर्घ चर्चा झाली. तसेच खडसेंनी तुपकरांचे कौतुक केले. त्यामुळे रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) राष्ट्रवादी काँग्रसमध्ये जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

Eknath Shinde, Ravikant Tupkar
Congress News : काँग्रेसचा मोठा निर्णय; सतेज पाटील, प्रणिती शिंदे, अतुल लोंढेंवर सोपवली नवी जबाबदारी

एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले, रविकांत तुपकर हे असे व्यक्तीमत्व आहे की जे सर्वांना हवेहवेसे आहे. ते माझे सहकारी आहेत. चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. मी चळवळीमधूनच नेता झालो आहे. चळवळीमधून काम करताना मंत्री झालो. संघर्ष करीत इथपर्यंत आलो आहे. त्यामुळे संघर्ष करणाऱ्या व्यक्तींविषयी माझ्या मनात नेहमीच आदर राहिलेला आहे.

Eknath Shinde, Ravikant Tupkar
BJP News : काल हनुमान चालिसा अन् उद्या सुंदरकांड, वज्रमूठ सभेला कोर्टात आव्हान ?

राज्यातील स्थितीवरून खडसे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही (State Government) टीका केली. ते म्हणाले, "येथे जिल्हाधिकारी आणि एसपींच्या बैठकीसाठी आलो होतो. त्यावेळी तुपकरांनी चहासाठी आमंत्रण दिले. त्यावेळी त्यांच्याशी व कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर चर्चा झाली. बुलढाणा जिल्ह्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. कुणालाही नुकसान भरपाई मिळालेली नाही. अशा स्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री आयोध्येला जाऊन दर्शनामध्ये दंग राहतात. त्यांना जिल्ह्याकडे पाहण्यासाठी वेळ नाही."

Eknath Shinde, Ravikant Tupkar
ADR Report : देशातील 29 मुख्यमंत्री करोडपती; एकनाथ शिंदेंकडे आहे 'इतकी' संपत्ती

तुपकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवास करणार का, या प्रश्नावर मात्र त्यांनी नाकारार्थी उत्तर दिले. खडसे म्हणाले, "तुपकर राष्ट्रवादीत येणार नाहीत. तशी त्यांनी भूमिका मांडलेली नाही. ते स्वतंत्रपणे लोकसभेला किंवा विधानसभेला उभे राहतील. त्यात ते चांगल्या मतांनी निवडून येतील."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com