पाचपावलीत दोघे करणार होते गंभीर गुन्हा; त्यापूर्वीच पोलिसांनी पिस्तूल, माऊजर केले जप्त...

ही कारवाई काल मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी दोघांनाही नागपूर (Nagpur) शहरातील पाचपावली पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पाचपावलीत दोघे करणार होते गंभीर गुन्हा; त्यापूर्वीच पोलिसांनी पिस्तूल, माऊजर केले जप्त...

नागपूर : पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ठक्करग्राम परिसरात कुख्यात गुंडाच्या घरातून एक पिस्तूल, (Pistol) माऊजर आणि ८ जिवंत काडतुसांसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई काल मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी दोघांनाही नागपूर (Nagpur) शहरातील पाचपावली पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

शशांक सुनील समुद्रे (वय २३, रा. पाचपावली ठक्करग्राम) आणि अभय अजय हजारे (वय २२, रा. बाळाभाऊपेठ) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ठक्करग्राम परिसरात राहणारा कुख्यात गुंड शशांक याच्याकडे शस्त्रसाठा (Weapons) असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी घराच्या झडतीमध्ये एक पिस्तूल, ८ जिवंत काडतूस, सात तलवारी, एक कोयता आणि दोन चायना मेड चाकू (Nife) सापडले.

त्याला ताब्यात घेत पोलिसांनी पिस्तूल नेमके कुठून आणले, याबाबत जाब विचारला असता, त्याने अभय हजारेकडून दहा दिवसांपूर्वीच खरेदी केल्याचे सांगितले. पोलिसांनी बाळाभाऊपेठ येथील अभय हजारेचा शोध घेतला असता, त्याच्या दुचाकी वाहनाच्या डिक्कीमध्ये एक माऊजर आढळून आले. यावेळी अभयने पिस्तूल आणि माऊजरची खरेदी विलास कटारे (रा. कांजीहाऊस) याच्याकडून केल्याचे सांगितले. विलास कटारे अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान या शस्त्राच्या साहाय्याने दोघेही शहरात मोठ्या कारवाईला पूर्णत्वास नेण्याच्या तयारीत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करीत, त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले. त्यांना १ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मेंढे, गुन्हे पोलिस निरीक्षक रवि नागोसे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रांत थारकर, उपनिरीक्षक अविनाश जायभाये, रहेमत शेख, हवालदार विजय यादव, शिपाई अमित सातपुते, प्रकाश राजपल्लीवार, नितीन वर्मा, पवन भटकर, अंकुश राठोड, वासुदेव जयपुरकर, गणेश ठाकरे, राजू श्रीवास, शहनवाज मिर्जा यांनी पार पाडली.

पाचपावलीत दोघे करणार होते गंभीर गुन्हा; त्यापूर्वीच पोलिसांनी पिस्तूल, माऊजर केले जप्त...
पिस्तुल घेऊन पळत येणाऱ्या चोरट्याला पोलिसाने जीवाची बाजी लावून पकडले...

दोघेही अट्टल गुन्हेगार..

पाचपावली पोलिसांनी अटक केलेला अभय हजारे आणि शशांक समुद्रे हे दोघेही अट्टल गुन्हेगार आहेत. अभयवर यशोधरानगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून गंभीर जखमी करणे, दंगल पसरविणे, शस्त्र बाळगणे आदी अनेक गुन्हे दाखल आहेत. याशिवाय शशांकवरही खून वगळता सर्वच गुन्हे दाखल आहेत.

दोन दिवसांपूर्वी दाखविला पिस्तुलाचा धाक..

अभय आणि शशांक यांनी दोन दिवसांपूवीच पाचपावली पुलाखाली एकाला शस्त्राचा धाक दाखवीत धमकाविल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध तक्रार देण्याचे याबाबत आवाहन केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com