Uddhav Thackeray News : सर्वत्र सामसूम राऊतांचाही उत्साह मावळला, उपराजधानीत उद्धव सेनेचे अस्तित्व काय?

Loyal Shiv Sainik : सर्वत्र सामसूम असल्याने निष्ठावान शिवसैनिक संभ्रमात आहेत.
Sanjay Raut and Uddhav Thackeray
Sanjay Raut and Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News : शिंदे सेनेच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली असली तरी नागपूर जिल्ह्यात सर्वत्र सामसूम असल्याने निष्ठावान शिवसैनिक संभ्रमात आहेत. वरिष्ठ विचारत नाही आणि स्थानिक पदाधिकारी काम करीत नाहीत. त्यामुळे ‘कोणता झेंडा घेऊ हाती’, अशी अवस्था त्यांची झाली आहे. (They have become like 'which flag to take')

उद्वव बाळासाहेब ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच मुंबईत बैठक बोलावली होती. त्याकरिता नागपूर जिल्ह्यातील मोजके आठ ते १० पदाधिकारीच उपस्थित होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी चांगलीच नाराजी दर्शवल्याचे समजते. महाविकास आघाडीचे सरकार पाडल्याने मुंबईत मोठी अस्वस्थता आहे. स्वतः उद्धव ठाकरे यांनी पुन्हा सर्वांना जोमाने कामाला लावले आहे.

नागपुरात (Nagpur) मात्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Uddhav Thackeray) अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न सर्वांना पडत आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सुरुवातीला नागपूरच्या फेऱ्या वाढवल्या होत्या. दोन तीन दिवस मुक्काम केला होता. आपण स्वतः नागपूरकडे लक्ष घालू, असे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे शिवसैनिकात उत्साह निर्माण झाला होता.

भाजपसोबत युती केल्याने शिवसेना कमजोर झाली, ती चूक पुन्हा करणार नाही, असे सांगून राऊत यांनी जुन्या सर्व जागा लढण्याची तयारी दर्शवली होती. मात्र आता त्यांचाही उत्साह मावळला असल्याचे दिसून येते. मुंबईच्या बैठकीला असलेली उपस्थिती बघता शिवसेना आता फक्त पदाधिकाऱ्यांपुरती मर्यादित झाल्याचे दिसून येते. राज्यात लोकसभा, विधानसभा आणि महापालिका अशा एका पाठोपाठ निवडणुका होण्याची शक्यता आहे.

Sanjay Raut and Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Vs BJP : भाजपच्या धडाडत्या तोफा अचानक ठाकरेंवर का वळल्या ? इंडिया आघाडीतील वाढतं महत्व,पंतप्रधानपदाचा चेहरा की...

एकीकडे महायुती तर दुसरीकडे महाआघाडी एकमेकांसमोर उभी ठाकणार आहे. नागपूरसारख्या उपराजधानीच्या शहरात उद्वव ठाकरे यांच्या शिवसेनेला जागावाटपात चांगले स्थान मिळवायचे असेल तर अस्तित्व दाखवावे लागणार आहे. मागील निवडणुकीत दोन नगरसेवक निवडून आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सेनेचे दोन तुकडे झाले आहेत.

अशा परिस्थितीत या जागा टिकवणेही उद्धव सेनेला अवघड होणार आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या निवडणुकीचे फार काही देणेघेणे दिसत नाही. कुठलेही मोठे आंदोलन व धोरणात्मक भूमिका स्थानिक पदाधिकारी घेताना दिसत नाही. त्यामुळे महापालिकेत जागांसाठी शिवसेनेला पूर्णपणे काँग्रेसला लोटांगण घालावे लागणार आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com