Uddhav Thackeray's Members : उद्धव ठाकरेंच्या सदस्यांनी सभागृहातच फाडल्या ‘त्या’ कार्यक्रमाच्या पत्रिका !

Akola ZP : दुखावलेल्या सदस्यांनी पत्रिका फाडून संतापाला वाट मोकळी करून दिली.
Akola ZP Members
Akola ZP MembersSarkarnama
Published on
Updated on

Akola District Political News : अकोला जिल्ह्यात उद्या (ता. सात) विविध रुग्णालयांचे कोनशिला अनावरण आणि लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. मात्र, या एवढ्या मोठ्या कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिका जिल्हा परिषदेच्या सदस्यांना 'झेरॉक्स' स्वरूपात दिल्या. ‘झेरॉक्स’ दिल्यामुळे दुखावलेल्या सदस्यांनी पत्रिका फाडून संतापाला वाट मोकळी करून दिली. (Aggrieved members tore up the pamphlets and gave way to anger)

अकोला जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत आज (ता. सहा) हा प्रकार घडला. निषेध नोंदवत थेट निमंत्रण पत्रिकाच सभागृहात फाडून फेकून देण्यात आल्या. जिल्हा परिषद सदस्यांना एवढी तुच्छतेची वागणूक का, असा सवाल आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना या वेळी सदस्यांनी केला.

अकोला जिल्ह्यातील जिल्हा सर्वाैपचार रुग्णालयात उद्या शनिवारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा, बोरगाव मंजू येथील ग्रामीण रुग्णालय भूमिपूजन, तसेच शिवापूर येथील १०० खाटांच्या रुग्णालयाच्या कोनशिला अनावरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

जिल्ह्याचे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांना तुच्छ वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. आज जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा पार पडली. या सभेतच सदस्यांना या कार्यक्रमाच्या पत्रिका वाटण्यात आल्या. मात्र, या पत्रिका 'झेरॉक्स' स्वरूपात असल्याचा आरोप करीत शिवसेना ठाकरे गटाच्या सदस्यांनी सभागृहातच पत्रिका फाडल्या. या वेळी सभागृहात असलेल्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला याचा जाब विचारण्यात आला.

शिवसेना ठाकरे गटाच्या गटनेत्याने केला मुद्दा उपस्थित...

जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा आज शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. सभा सुरू असताना उद्याच्या कार्यक्रमाच्या पत्रिका सभेत सदस्यांसह पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या वेळी सभेत शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते गोपाल दातकर यांनी दिलेल्या पत्रिका सभागृहात दाखवल्या. त्या झेरॉक्स स्वरूपात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्या पत्रिकेवर सदस्याचे नावही लिहिण्यात आले नव्हते.

गोपाल दातकर यांच्यासह सदस्य प्रशांत अढाऊ यांनीही हा मुद्दा उचलून धरला, तर अपक्ष सदस्य गजानन पुंडकर, काँग्रेसचे चिंचोलकर यांनीही पाठिंबा दिला. अशा प्रकारच्या पत्रिका देऊन जिल्हा परिषदेच्या सदस्यांना तृच्छतेची वागणूक का दिली जाते, असा सवाल या वेळी उपस्थित करण्यात आला. या पद्धतीने जिल्हा परिषद सदस्यांना निमंत्रण पत्रिका कशी दिली जाते.

जिल्हा परिषद सदस्यांचा अपमान का, असा सवाल जिल्हा परिषद सदस्यांनी सभागृहाला विचारला. दरम्यान, यावर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली. तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यापुढे असे व्हायला नको अशी तंबी दिली. यापूर्वीही अशा प्रकारच्या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्यांना अशीच वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Edited By : Atul Mehere

Akola ZP Members
Akola-Amravati Loksabha News : ‘बाप नहीं, तो बेटेही सही’ अकोला, अमरावतीकरांची भावना; ‘कॅप्टन’चे ‘विमान’ झेपावणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com