Nitin Gadkari On Contractor:'...तर मी कॉन्ट्रॅक्टरला बुलडोझरखाली टाकीन'; नितीन गडकरींची ठेकेदारांना तंबी

MLA and MP : आमदार-खासदारांसह पदाधिकाऱ्यांची देखील त्यांनी कानउघाडणी केली.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

Washim News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाशिममध्ये एका कार्यक्रमात धडाकेबाज भाषण करत आमदार-खासदारांसह पदाधिकाऱ्यांनाही चांगलच सुनावलं आहे. तसेच यावेळी गडकरींनी कॉन्ट्रॅक्टरलाही इशारा दिला. "रस्ता खराब झाला तर मी कॉन्ट्रॅक्टरला बुलडोझरखाली टाकेन", अशी तंबी गडकरींनी ठेकेदारांना दिली.

"ठेकेदारांवर प्रेशर आणून त्यांच्याकडून मी काम करुन घेतो, पण तुम्ही ठेकेदारांना (कॉन्ट्रॅक्टर) त्रास देऊ नका. आतापर्यंत 50 लाख कोटींपेक्षा जास्त रुपयांची कामे ठेकेदारांना दिली. मात्र, एकाही ठेकेदारांना कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याकरता माझ्या घरी येण्याची गरज पडली नाही. रस्त्याला तडा गेला किंवा रस्ता खराब झाला तर ठेकेदाराला बुलडोझरखाली टाकेन", असं गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari
Mahayuti Government Politics : सरकार फुल्ल मेजॉरिटीत, पण 'जनमता'बद्दल सरकारच्या मनात धाकधूक कायम; म्हणूनच...

नितीन गडकरी यांनी आमदार-खासदारांसह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करत दबाव आणत ठेकेदारांना त्रास देऊ नका, असे सांगत त्यांनी कान टोचले. तसेच रस्त्यांच्या कामासाठी पैशांची कमतरता नाही. पण यासाठी जनतेने सहकार्य केले पाहिजे, तरच चांगले रस्ते होतील, असंही गडकरींनी सांगितलं.

दरम्यान, नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी कायमच ओळखले जातात. तर आता त्यांनी वाशिममध्ये बोलताना ठेकेदाराला बुलडोझरखाली टाकेन, असे म्हणत कॉन्ट्रॅक्टरला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. तसेच आमदार-खासदारांसह पदाधिकाऱ्यांची देखील त्यांनी कानउघडणी केली.

Edited By- Ganesh Thombare

Nitin Gadkari
Sachin Vaze Bail: मोठी बातमी ! खंडणी प्रकरणात सचिन वाझेला जामीन मंजूर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com