Cricketnama 2023 : ‘क्रिकेटनामा’तून घडेल राजकीय एकोप्याचं दर्शन

Aaditya Durugkar : नागपूरच्या जिल्हाध्यक्षांच्या हस्ते ‘टीम मनसे’च्या टी शर्टचं अनावरण
Cricketnama T-Shirt of MNS Team.
Cricketnama T-Shirt of MNS Team.Sarkarnama

Nagpur News : राजकीय बातम्यांसाठी अग्रेसर असलेल्या ‘सरकारनामा’ या वेबपोर्टलच्या वतीने नागपूर येथे 11 व 12 डिसेंबरदरम्यान ‘क्रिकेटनामा’ या भव्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेतून राजकीय वर्तुळातील दिग्गज नेते मैदानात उतरणार आहेत. क्रिकेटनामा स्पर्धेतून महाराष्ट्रातील राजकीय एकोप्याचं दर्शन निश्चित घडेल, असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नागपूर जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर यांनी व्यक्त केला.

‘क्रिकेटनामा’ स्पर्धेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची टीमही सहभागी होणार आहे. मनसे क्रिकेट टीमसाठी असलेल्या टी शर्टच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. (Unveiling Of T Shirts For Team MNS Participating in Cricketnama Competition of Sarkarnama At Nagpur By Hands Of MNS Nagpur District President Aaditya Durugkar)

Cricketnama T-Shirt of MNS Team.
Marathi Boards on Shops : दुकानांवर मराठी पाट्या न लावल्यास पुन्हा 'खळ्ळ- खट्याक' ; मनसेचा प्रशासनाला इशारा!

विविध राजकीय पक्षातील नेते, मंत्री, खासदार, आमदार आता ‘क्रिकेटनामा’च्या मैदानावरही ताकदीने लढणार आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून ‘क्रिकेटनामा ट्रॉफी’ कशी जिंकता येईल यासाठी भाजप, शिवसेनेचे ठाकरे-शिंदे गट, राष्ट्रवादीतील साहेब-दादांची टीम, मनसेचा संघ, बच्चूभाऊंचा ‘प्रहार’, राणांचा ‘युवा स्वाभिमान’ आणि ‘वंचित’चे खेळाडू खेळणार आहेत. ऐन हिवाळी अधिवेशनात त्यातही नागपुरात भरणाऱ्या ‘सरकारनामा’च्या क्रिकेटनामाची राजकीय वर्तुळात ‘क्रेझ’ प्रचंड वाढल्याचे दिसून येत आहे.

क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलनंतर आता ‘क्रिकेटनामा’कडे साऱ्या राजकीय, क्रीडा वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नेत्यांमध्ये सांघिक भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘क्रिकेटनामा’चे आयोजन करण्यात येत आहे. सकाळ माध्यम समूहाच्या ‘सरकारनामा’ या बेवपोर्टलकडून ‘क्रिकेटनामा’ या स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धेचे हे दुसरे सीझन असून, राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे निमित्त साधत यंदा नागपूरमध्ये ‘क्रिकेटनामा’ घेण्यात येणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

क्रिकेटनामाची संकल्पनाच मुळात उत्तम आहे. राजकीय आखाड्यासोबतच ‘क्रिकेटनामा ट्रॉफी’ पटकावत खेळाच्या मैदानावरही आपली हुकूमत राखण्याची तयारी राजकीय पक्षांनी केली आहे. अशात मनसेसाठी असलेल्या टी शर्टचे अनावरण मनसे नागपूर जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर यांच्या हस्ते झाले. ‘सरकारनामा’चे विभागीय वरिष्ठ प्रतिनिधी अतुल मेहेरे या वेळी उपस्थित होते. ‘सरकारनामा’चा हा क्रीडा उपक्रम अत्यंत स्तुत्यपूर्ण आहे. राजकीय आखाड्यातील दिग्गजांना खेळाच्या मैदानावर एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे. त्यातून संपूर्ण महाराष्ट्राला राजकीय वैरभाव विसरून नेते खिलाडूवृत्तीनं मैदानावर कसे दंग होतात, हे बघायला मिळणार असल्याचे आदित्य दुरुगकर या वेळी म्हणाले. मनसेच्या संघालाही त्यांनी या वेळी क्रिकेट सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या. ‘टीम स्पिरीट’ने मनसेच्या संघाने हा चषक जिंकावा, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

Edited by : Prasannaa Jakate

Cricketnama T-Shirt of MNS Team.
राज ठाकरे भडकले, 'त्या' मुद्द्यावरून सरकरला सुनावलं | Raj Thackeray

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com