Akola news : सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील व्यापारी संघटनेला दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे निर्देश दिल्यानंतर मराठी पाट्या लावण्याची २५ नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे मुदत संपत असताना ज्यांच्या दुकानांवर मराठी पाट्या दिसणार नाहीत, तिथे 'खळ्ळ- खट्याक' करण्याची तयारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे.
त्यापूर्वी अकोल्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाला निवेदन देऊन व्यापाऱ्यांना मराठी पाट्या दुकानांवर लावण्याचे सूचित करावे, असं निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, मुदतीपर्यंत मराठी पाट्या न लावल्यास 'खळ्ळ- खट्याक' करण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापला असताना दुसरीकडे दुकानांवर मराठी पाट्या लावण्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक भूमिका घेऊ शकते. तसा इशाराच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी प्रशासनाला आणि व्यापारी संघटनांना दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबईसह राज्यातील व्यापारी संघटनेला दोन महिन्यांत दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. ही मुदत २५ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यापूर्वी दुकानांवर मराठी पाट्या लावण्यात याव्यात, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे.
'खळखट्ट्याक' करण्याचा थेट इशाराच मनसेने प्रशासनाला दिल्याने पोलिस अलर्ट मोडवर आले आहेत. अकोलामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना सर्व दुकानदारांना त्यांच्या दुकानावरील पाट्या मराठीत करण्यास भाग पाडावे, अशा आशयाचं निवेदन दिले आहे. पुढील दोन दिवसांनंतर ज्या दुकानांवर मराठी फलक आढळून येणार नाही. त्यांच्यासाठी मनसे शैलीत ''खळ्ळ- खट्याक' आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेनेकडून निवेदनात देण्यात आला आहे.
मनसेने सुरुवातीपासून मराठी पाट्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यात सर्वोच न्यायालयाने दिलेली 'डेडलाइन' २५ नोव्हेंबरला संपत आहे. अनेक ठिकाणी अद्यापही मराठी भाषेत पाट्या लावण्यात आल्या नाहीत. त्यामुळे मनसे पुढील काही दिवसांत आक्रमक होण्याची चिन्ह आहेत. निवेदन देताना मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, शहर अध्यक्ष सौरभ भगत, उपशहर अध्यक्ष राजेश पिंजरकर, मुकेश धोंडफळे, चंदू अग्रवाल, शुभम कवोकार, विभाग अध्यक्ष अमोल भेंडारकर, कुणाल सप्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.