Attack on EVM Van : खळबळजनक! EVM नेणारी गाडी फोडली; मध्य नागपूरमध्ये राडा

Shocking incident EVM transport vehicle attacked in Nagpur: काँग्रेस अन् भाजप कार्यकर्ते भिडले; तर पूर्व नागपूरमध्येही भाजप अन् राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने
EVM  Van
EVM VanSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Election Voting Update: नागपूर शहरात दिवसभर मतदानाची प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली असली तरी मतदान आटोपल्यानंतर मात्र मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम घेऊन जात असताना अधिकाऱ्यांची कार फोडण्यात आली. त्यामुळे मोठी खळबळ उडली आहे. ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याच्या अफवेतून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

मध्य नागपुरातील पक्वासा रुग्णालयाजवळ असलेल्या गोंडवाना कॉन्व्हेंट येथील मतदानानंतर दोन अतिरिक्त ईव्हीएम कारमध्ये टाकण्यात आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांनी ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या शासकीय वाहनावर हल्ला केला. तसेच ईव्हीएम हिसकावण्याचाही प्रयत्न केला.

हा प्रकार सुरू असतानाच भाजपचेही (BJP) कार्यकर्ते घटनास्थळी दाखल आहे. दोन्ही कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याने मोठा राडा झाला. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. घटना कळताच सहायक पोलिस आयुक्त मोरे यांच्यासह पोलिस निरीक्षक पोहनकर यांनी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगचे परिस्थिती नियंत्रणात आणली. या गडबडीत ईव्हीएमचे सील तुटल्याने पोलिसांच्या देखरेखीत पुन्हा एकदा सील लावण्यात आल्याची माहिती आहे. मात्र यास पोलिसांनी नकार दिला.

EVM  Van
Maharashtra Election 2024 Exit Poll LIVE : एक्झिट पोलचे कल महायुतीच्या बाजुने ; फडणवीसांनी घेतली सरसंघचालकांची भेट!

'ईव्हीएम'सील करण्यापूर्वीच काढले सीसीटीव्ही -

पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातील हिवरीनगरात येथील प्रशांत विद्यालयात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच राडा केला. येथे मतदानाची प्रक्रिया संपल्यावर कंत्राटदाराने येथे लावण्यात आलेले सीसीटीव्ही काढून घेतले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला.

EVM  Van
Exit Poll Result Vidhansabha Election : एक्झिटपोलनुसार महाराष्ट्रात महायुतीचंच पारडं जड; 'मविआ' बहुमतापासून लांबच!

तसेच उमेदवार दुनेश्‍वर पेठे यांना पोलिसांकडे कारवाईची मागणी केली. यावेळी शेकडो कार्यकर्ते एकत्र येऊन भाजपविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे भाजपचे कार्यकर्तेही एकवटले. त्यातून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com