नागपुरात ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या चार चाकी वाहनावर हल्ला करून त्या वाहनाची मोडतोड करण्यात आली आहे.मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील किल्ला परिसरात बुथ क्रमांक 268 मधून संध्याकाळी सात ते साडेसात वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे..जेव्हा किल्ला परिसरात बुथ क्रमांक 268 वरून ईव्हीएम घेऊन जाणारी तवेरा गाडी मतदान केंद्रातून बाहेर निघाली, तेव्हा त्या गाडीवर हल्ला करण्यात आलं. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे.
बडनेरा मतदारसंघात गोपाल नगर येथील राजीव गांधी विद्यालयातून चार ईव्हीएम मशीन दुचाकी वाहनावरून नेल्याचा नागरिकांचा आरोप. ईव्हीएम मशीन दुचाकीवरून कसा नेल्या यावरून राडा. बडनेरा मतदारसंघाच्या शिवसेना बंडखोर उमेदवार प्रीती बंड व भाजपाचे माजी नगरसेवक सुनील काळे घटनास्थळी दाखल.
नंदुरबार जिल्ह्यात अजुनी अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून येत आहेत. रात्री उशीरापर्यंत मतदान सुरू राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
औरंगाबाद पश्चिमचे आमदार तथा शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यावर धावून गेले. या प्रकारामुळे मतदान केंद्रांवर काही काळ वातावरण तापले होते.
पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी इथं हुल्लडबाज जमावापासून वाचण्यासाठी भाजप आमदार मोनिका राजळे यांनी स्वतःला एका खोलीत बंद करून घेतल्याचा प्रकार घडला. शिरसाटवाडी इथं बूथ ताब्यात घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर भाजप आमदार मोनिका राजळे या तिथे भेट देण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्यावर जमाव चालून आला. दरम्यान मोठा जमाव असल्याने त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले. संबंधित खोली बाहेर मोठा जमाव होता. पोलिस बंदोबस्त कमी असल्याने मोनिका राजळे या बाहेर येण्यास तयार नव्हत्या. शेवटी त्यांनी दूरध्वनीवरून पोलिसांशी संपर्क करत मदत मागवली. बाहेरील जमाव हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा असल्याचा दावा, आमदार राजळेंकडून केला. शेवटी अतिरीक्त पोलिस बंदोबस्त आल्यानंतर आमदार राजळे यांना शिरसाटवाडीतून बाहेर पडल्या.
इलेकोट्ल एज - महायुती - १२१, मविआ- १५०, अपक्ष - २०
पोल डायरी - १२२-१७६, मविआ - ६९-१२१, इतर १२-१९
चाणक्य स्ट्रॅटजीस - महायुती -१५२-१६०, मविआ - १३०-१३८, इतर- ६-८
मॅट्रिझ - महायुती १५०-१७०, मविआ -११०-१३०, अन्य ८-१०
पीपल्स पल्स - महायुती १७५-१९५, मविआ-८५-१२, अपक्ष-७-१२
इलेक्ट्रोल एजचा पोलनुसार एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला बहुमत मिळत आहे. मविआला 150 तर महायुतीला 121 आणि अपक्ष 17 जागा मिळत असल्याचे या पोलनुसार दिसत आहे.
महायुती
भाजप -78
शिवसेना - 26
राष्ट्रवादी काँग्रेस- 14
मविआ
काँग्रेस - 60
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे - 44
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र शरद पवार पक्ष- 46
अपक्ष
17
सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात 71.97% मतदान झाले.कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी घटली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात सरासरी 74.45% इतके मतदान झाले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील 33 लाख 5 हजार 98 मतदार आणि बजावला मतदानाचा हक्क.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सायंकाळी पाचपर्यंत 58.22 टक्के मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक 69.63 टक्के तर मुंबईत 49.07 टक्के मतदान झाले. सायंकाळी सहा पर्यंत मतदानसुरू होते त्यामुळे मतदानाचा टक्का आणखी वाढणार आहे.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघात मोठा राडा झाला आहे. राजेश क्षीरसागर आणि लाटकर समर्थक आपसांत भिडले आहेत. दोन्ही गटाकडून घोषणाबाजी केली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांना मारहाण झाली आहे. सिल्लोड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदान केंद्रावरही सुरेश बनकर यांना धक्काबुक्की करून बसवण्याचा प्रयत्न झाला आहे.
पुणे जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 54.09 टक्के मतदान पार पडले. यामध्ये सर्वाधिक मतदान मावळ - 64.44 टक्के, जुन्नर -62.12 टक्के, खेड आळंदी 61.57 टक्के, कसबा-54.51 टक्के, खडकवासला 51.56, पर्वती - 48.65 टक्के, कोथरूड -47.42टक्के मतदान झाले.
मिरा भाईंदरमध्ये भाजप उमेदवार नरेंद्र मेहता यांचे स्वीय सहाय्यक,कार्यकर्ते आणि अपक्ष उमेदवार गीता जैन यांचे समर्थक भिडले. भाईंदर पश्चिमेच्या अहिंसा चौक जवळ ही घटना घडली.
ज्यातील विधानसभा मतदारसंघासाठी नागपूर जिल्ह्यात सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 44.45 टक्के मतदान पार पडलं आहे.
मतदारसंघानुसार नागपूर जिल्ह्यातील मतदान पुढीलप्रमाणे -
हिंगणा - 43.38 %, कामठी 43.24%, काटोल 43.20%, नागपूर मध्य 41.10%, नागपूर पूर्व 44.97%, नागपूर उत्तर 41.01%, नागपूर दक्षिण 43.40%, नागपुर दक्षिण पश्चिम 41.75%, नागपूर पश्चिम 40.93%, रामटेक 51.18%, सावनेर 50.38%, उमरेड 54.04 %
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान झाले आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 54.06 टक्के मतदान झालं आहे. मतदारसंघानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील मतदान पुढीलप्रमाणे -
इचलकरंजी 45.28 टक्के
चंदगड 54.63 टक्के
हातकणंगले 50.01 टक्के
कागल 58.71 टक्के
करवीर 58.63 टक्के
कोल्हापूर उत्तर 48.03 टक्के
कोल्हापूर दक्षिण 51.20 टक्के
शाहुवाडी 61.07 टक्के
राधानगरी 59.50 टक्के
शिरोळ 52.66 टक्के
गडचिरोली जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया संपली आहे. गडचिरोली वगळता उर्वरित महाराष्ट्रात सकाळी 7 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. मात्र, गडचिरोली जिल्ह्यात सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान पार पडलं. गडचिरोली हा अतिसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त जिल्हा असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोतून तिथे मतदानाची वेळ कमी ठेवण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यातील मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 1 पर्यंतची टक्केवारी पुढीलप्रमाणे
ठाणे - 32.51 टक्के, ओवळा-माजिवडा 26.71 टक्के, कोपरी-पांचपाखाडी 32.21 टक्के, मुंब्रा-कळवा मतदारसंघात 27.39 टक्के इतकं मतदान झालं आहे.
सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 33.50 टक्के मतदान पार पडलं आहे.
जिल्ह्यातील मतदारसंघातील टक्केवारी पुढीलप्रमाणे
सांगली - 32.23 टक्के
मिरज - 30.83 टक्के
इस्लामपूर - 39.02 टक्के
पलूस-कडेगाव - 31.59 टक्के
शिराळा - 37.82 टक्के
खानापूर - 31.59 टक्के
तासगाव कवठेमहांकाळ - 33.51 टक्के
जत - 30.78 टक्के
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे यांच्यावर दारू आणि पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिंदे गटाच्या वर्षा भोसले यांच्या तक्रारीनंतर त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेते माधव जाधव यांना परळीत मारहाण झाल्यानंतर त्यांच्या मूळ गावी घाटनांदुर येथील मतदान केंद्रावर तोडफोड झाल्याची घटना घडली आहे. परळी विधानसभा मतदारसंघातील घटनांदूरमधील मतदान केंद्रात मतदान चालू असतानाच काही जाधव यांच्या काही कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राची तोडफोड केली आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर आणि काँग्रेस नेते सतेज पाटील समर्थकांमध्ये बाचाबाची झाल्याची घटना उघडकीस आली आहे. टेंबलाईवाडी उड्डाणपूल येथे ही बाचाबाची झाली. राजेश क्षीरसागर मतदान केंद्रावर जात असताना नागरिकांनी त्यांना थांबण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही बाचाबाची झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होत.
विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण राज्यभरातील 288 मतदारसंघासाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू असून दुपारी 1 वाजेपर्यंत 32 टक्के मतदान पार पडलं आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया शांततेत सुरु झाली आहे. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात 3 हजार 452 मतदान केंद्रांवर सुरु असलेल्या मतदानाची मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे.
चंदगड – 39.19 टक्के
राधानगरी – 42.82 टक्के
कागल – 41.36 टक्के
कोल्हापूर दक्षिण – 35.15 टक्के
करवीर – 45.29 टक्के
कोल्हापूर उत्तर – 35.53 टक्के
शाहूवाडी – 41.30 टक्के
हातकणगंले – 35.15 टक्के
इचलकरंजी – 32.79 टक्के
शिरोळ – 37.03 टक्के
जालना जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे. जिल्ह्यात सुरु असलेल्या सरासरी मतदान मतदानाची मतदारसंघ निहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे.
1) 99, परतूर विधानसभा मतदारसंघ - 32.56 टक्के
2) 100, घनसावंगी विधानसभा मतदारसंघ - 36.35 टक्के
3) 101,जालना विधानसभा मतदारसंघ - 34 टक्के
4) 102, बदनापुर विधानसभा मतदारसंघ (एससी राखीव) - 40.02 टक्के
5) 103, भोकरदन विधानसभा मतदारसंघ - 38.92 टक्के
राज्यातील सर्वाधिक चर्चेतील बारामतीत विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची प्रक्रिया पार पडत आहे. मात्र, येथील महात्मा गांधी बालक मंदिर बूथमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांना दमबाजी केली जात असल्याचा गंभीर आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी केला आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांनी पैसे घेऊन मतदान केल्याने लोकशाही धोक्यात येते असं म्हटलं आहे. सोबतच मतदारांनी चारित्र्य संपन्न उमेदवारालाच मतदान केलं पाहिजे. महाराष्ट्रात बदल घडवायचा असेल तर उमेदवार चारित्र्यशील असला पाहिजे, असंही ते यावेळी म्हणाले.
कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात 3 हजार 452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरु आहे. जिल्ह्यात सुरु असलेल्या मतदानाची मतदारसंघ निहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे.
271- चंदगड – 22.01 टक्के
272- राधानगरी - 23.00 टक्के
273- कागल – 23.68 टक्के
274- कोल्हापूर दक्षिण – 17.57 टक्के
275- करवीर – 26.13 टक्के
276- कोल्हापूर उत्तर – 20.75 टक्के
277- शाहूवाडी – 17.52 टक्के
278- हातकणगंले – 14.25 टक्के
279- इचलकरंजी – 19.77 टक्के
280- शिरोळ – 21.43 टक्के
तासगाव कवठेमहांकाळ विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पाटील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय काका पाटील हे दोघेही एकाच मतदान केंद्रावर मतदानासाठ आले होते. परंतु दोघांनीही समोरासमोर येणे टाळलं आहे. तासगाव तालुक्यातील चिंचणी गावातील मतदान केंद्रावर हे दोघे एकाच वेळी आल्याने पोलिस सतर्क झाले होते. त्यानंतर रोहित पाटील एका गेटने तर संजयकाका दुसऱ्या गेटने बाहेर पडले.
राज्यभरात विधानसभा निवडणुकीचा उत्साह दिसून येत आहे. सकाळी सात ते अकरा या चार तासांमध्ये अनेक मतदारसंघात मतदानाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळत आहे.
11 वाजेपर्यंत वाढलेली टक्केवारी पुढीलप्रमाणे
सांगली - 19.60 टक्के
कोरेगाव - 21.24 टक्के
निफाड - 17.64 टक्के
साक्री - 20.21 टक्के
नागपूर दक्षिण - 20.21 टक्के
परळी - 20 टक्के
पेण - 18.9टक्के
रावेर - 20.51 टक्के
खडकवासला - 17.5 टक्के
बेलापूर - 17.89 टक्के
ऐरोली - 17.72 टक्के
पंढरपूर विधानसभेसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. भाजप उमेदवार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा येथील मतदान केंद्रावर कुटुंबासमवेत मतदान केले. सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग अतिशय कमी राहिल्याचं पाहायला मिळत आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीसाठी जवळपास 24 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये भाजपकडून समाधान आवताडे, काँग्रेसचे भगीरथ भालके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल सावंत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिलीप धोत्रे यांचा समावेश आहे.
वांद्रे पूर्व येथील मतदान केंद्रावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तेजससोबत मतदानाचा हक्क बजावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ठाण्यातील मतदान केंद्रावर दाखल झाले होते. यावेळी त्यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबियांसोबत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदान हा उत्सव आणि आपलं कर्तव्य आणि अधिकार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व बंधू-भगिनींनी आणि राज्यातील जनतेने मतदान करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. तर लोकशाहीत सरकारकडून आपण अपेक्षा ठेवतो, त्या अपेक्षा ठेवत असताना जो मतदान करतो त्याला जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे. आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मतदान करावं, असंही ते म्हणाले. तर लोकसभेसारखं ऊन आज नाही त्यामुळे मतदानाचा टक्का निश्चित वाढेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या मतदानासाठी सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली असून 9 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 6.61 टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील जिल्हा निहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे -
अहमदनगर - 5.91 टक्के, अकोला - 6 टक्के,अमरावती - 6.6 टक्के, औरंगाबाद 7.5टक्के, बीड - 6.88 टक्के, भंडारा- 6.21 टक्के, बुलढाणा- 6.16 टक्के, चंद्रपूर- 8.5 टक्के,धुळे - 6.79 टक्के, गडचिरोली - 12.33 टक्के, गोंदिया -7.94 टक्के, हिंगोली - 6.45 टक्के, जळगाव - 5.85 टक्के, जालना- 7.51 टक्के, कोल्हापूर- 7.38 टक्के,लातूर 5.91 टक्के, मुंबई शहर - 6.25 टक्के, मुंबई उपनगर - 7.88 टक्के, नागपूर - 6.86 टक्के,नांदेड - 5.42 टक्के, नंदुरबार - 7.76 टक्के,नाशिक - 6.89 टक्के, उस्मानाबाद - 4.85 टक्के, पालघर- 7.30 टक्के, परभणी- 6.59 टक्के, पुणे - 5.53 टक्के, रायगड - 7. 55 टक्के, रत्नागिरी - 9.30 टक्के,सांगली - 6.14 टक्के,सातारा -5.14 टक्के, सिंधुदुर्ग - 8.61 टक्के,सोलापूर - 5.7 ,ठाणे 6.66 टक्के,वर्धा - 5.93 टक्के,वाशिम - 5.33 टक्के,यवतमाळ - 7.17 टक्के मतदान झाले आहे.
संभाजीनगर शहरात असूनही अतुल सावे, सतीश चव्हाण, इम्तियाज जलील, राजू शिंदे हे प्रमुख उमेदवार स्वतःला मतदान करू शकले नाहीत, कारण ते ज्या मतदारसंघांमध्ये उभे आहेत त्या मतदारसंघांमध्ये त्यांचे मतदार यादीत नाव नव्हते. अतुल सावे हे भाजपचे संभाजीनगर पूर्व विधानसभेचे मतदार आहेत मात्र त्यांचं मतदान मध्य विधानसभा मतदारसंघात आहे. सतीश चव्हाण हे गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत मात्र त्यांचं मतदान हे छत्रपती संभाजीनगर शहरात आहे.राजू शिंदे हे छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत तर त्यांचे मतदान संभाजीनगर पूर्व मतदारसंघात आहे.इम्तियाज जलील हे संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात उमेदवार आहेत मात्र त्यांचं मतदान हे मध्य विधानसभा मतदारसंघांमध्ये आहे.
आज सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे, तो आपला अधिकार आहे असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. तसंच योग्य माणूस निवडण्याची हीच संधी असून मराठा समाजाने शंभर टक्के मतदान करायचं. आपल्या लेकरांच्या बाजूने जो उभा राहिल त्याच्या बाजूने 100% मतदान करा, मतदान करताना आपल्या लेकाला आणि लेकीला विचारून मतदान करा, असंही जरांगे यांनी आवाहन केलं आहे.
सांगलीत महापालिकेचे माजी उपमहापौर विजय घाडगे यांच्यावर अहिल्यानगर, कुपवाड येथे गुंडांचा हल्ला. हातावर आणि बोटावर वार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या किरकोळ वादातून हल्ला झाला असून जखमी अवस्थेतील घाडगे यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून घाडगे समर्थकांची रुग्णालयात गर्दी केली आहे.
परळी विधानसभा मतदारसंघात धर्मापुरी बूथवर बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केला आहे. सीसीटीव्ही बंद करून बोगस मतदान करण्यात येत असल्याच्या गंभीर आरोप केल्यामुळे मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला आहे.
महाराष्ट्राचं व्यापाऱ्यांच्या माध्यमातून विकृतीकरण सुरू आहे. ही निवडणूक महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान या संदर्भात अत्यंत महत्त्वाची आहे .महाराष्ट्रामध्ये व्यापाऱ्यांचे आक्रमण झालं आहे. पैशाचा पाऊस या निवडणुकीत पडत आहे . मराठी माणसाने सावध राहावं आणि मतदान करावं . कालचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. आम्ही दौऱ्यावर जाताना आमच्या बॅगांची तपासणी केली जाते. मात्र, काल पैसे पकडल्यामुळे चित्र समोर समोर आलं आहे. आता मराठी माणसाने सावध राहावं आणि मतदान करावं, असं आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे.
आपला महाराष्ट्र धर्म हा संपूर्ण भारताला एक दिशा देतो आणि त्याच धर्माचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. आजची निवडणूक महाराष्ट्रातील शेतकरी, युवक, महिलांसाठी व महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्वाची असल्याचं वक्तव्य जेष्ठ नेते शरद पवार यांनी केलं आहे. ते मतदानासाठी गोविंद बागेतून माळेगावमध्ये आले होते. यावेळी त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्याआधी त्यांनी आजची निवडणूक अत्यंत महत्वाची असल्याचा संदेश मतदारांना दिला.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने मुंबईत संपूर्ण कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्याने सर्वांनी बाहेर पडून मोठ्या प्रमाणाता मतदान करण्याच आवाहन राज्यातील मतदारांना केलं आहे.
नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ यांनी येवला येथील जनता विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी डॉ. शेफाली भुजबळ यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला.
भाजप नेते राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी कुटुंबियांसह आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला. तर कोल्हापुरात दहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचेच उमेदवार निवडून येतील असंही ते यावेळी म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर येथील रामनगर गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गावात पायभूत सुविधा नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे ऐन मतदानाच्या दिवशी उमेदवार आणि प्रशासनाकडून ग्रामस्थांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
बारामती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी काटेवाडी येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला आहे. बारामतीतील लढतीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून आहे. इथे पुतण्या विरुद्ध काका अशी लढत होणार असून सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मध्यवर्ती बस स्थानकातील विक्रम हायस्कूल येथील 'ईव्हीएम' तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. तर या मतदारसंघावर महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर हे उपस्थित आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये 'ईव्हीएम'मध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मतदानाच्या सुरूवातीलाच मतदारांचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळत आहे.
लोकसभेला पवार साहेबांची मुलगी होती म्हणून त्यांना जास्त वेटेज दिलं. मात्र आता विधानसभेला लोकं आता अजित पवारांना साथ देतील ते मतदारसंघातील लोकांना नावाने ओळखतात, असा विश्वास कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
अभिनेता सुबोध भावे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कसबा पेठेतील गुजराती प्रायमरी शाळेतील मतदान केंद्रावर हजर झाला आहे. तो कसबा मतदारसंघाठी मतदान करणार आहे.
मॉर्निंग वॉकसाठी आलेले ज्येष्ठ नागरिक सकाळी 6 वाजताच मतदान केंद्रावर हजर. मतदान सुरू होण्याआधीच पुण्यातील मॉर्निंग वॉकसाठी आलेले ज्येष्ठ नागरिक मतदान केंद्राबाहेर दाखल झाले होते. त्यामुळे पुणेकर आपल्या मतदानाच्या हक्काबाबत जागरूक असल्याचं दिसून आलं आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या दोघांनी पहाटेच आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी अजितदादांनी आपण मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ असा विश्वास देखील व्यक्त केला आहे.
राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान होत असून महायुती, महाविकास आघाडीसह राज्यातील इतर पक्षांच्या एकूण 4136 उमेदवाराचे भवितव्य एव्हीएममध्ये बंद होणार आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.