Maratha Reservation : अकोल्यात आत्मक्लेश आंदोलनात आमदार, आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक

Protest in Akola : राजकीय मंडळींकडून निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याचा मुद्दा
Maratha Protest in Akola infont of MLA Nitin Deshmukh's Residence.
Maratha Protest in Akola infont of MLA Nitin Deshmukh's Residence.Sarkarnama
Published on
Updated on

Support for Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण मिळावं, यासाठी आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वणवा पेटत आहे. गुरुवारी (ता. २) अकोला येथे गरजवंत सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या घरासमोर आमदार आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक वाद झाला. राजकीय नेत्यांकडून निवेदन स्वीकारणार नाही, अशी भूमिका आमदार देशमुख यांनी घेतल्यानं शाब्दिक चकमक झाली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभर मराठ्यांच्या आंदोलनाचा एल्गार सुरू आहे. विविध मार्गानं आंदोलन केलं जातंय. आरक्षणाची मागणी लावून धरण्यात येत आहे. मराठा आरक्षण प्रश्नावरून अकोल्यातील आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं. गरजवंत सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. (Verbal dispute between MLA Nitin Deshmukh and protestors during Thiya Andolan for Maratha reservation in Akola)

पोलिसांनी आंदोलकांना नोटीस बजावल्यानंतरही अकोल्यातील आमदारांच्या घरासमोर आत्मक्लेश करण्यात आला. या आंदोलनादरम्यान आंदोलक आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार देशमुख यांच्यात निवेदन देण्याच्या विषयावरून शाब्दिक चकमक झाली. गरजवंत मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी नितीन देशमुख यांच्या अकोला शहरातील सुधीर कॉलनी येथील घरासमोर पोहोचले. त्यानंतर वादाला सुरुवात झाली.

मराठा आरक्षणासंदर्भातील निवेदन देण्यासाठी काही मंडळी पुढे आली. राजकीय पदाधिकाऱ्यांकडून आपण निवेदन स्वीकारणार नाही, अशी भूमिका त्यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी घेतली. निवेदन द्यायला आलेल्या शिष्टमंडळात वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर आमदार देशमुख यांचा आक्षेप होता. त्यामुळं त्यांनी आपण राजकीय नेत्यांकडून निवेदन स्वीकारणार नाही, असं ठामपणे नमूद केले. मात्र, मराठा आंदोलकांनी यावर हरकत घेतली. त्यामुळं शाब्दिक वाद झाला. आंदोलकांनी ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा दिल्या. त्यात आमदार देशमुख यांनीही साथ देत याच घोषणा दिल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वाद शांत झाल्यानंतर आमदार देशमुख यांनी विनायक पवार यांच्या हातानं निवेदन स्वीकारलं. आपण शासनापर्यंत मराठा समाजाचा आवाज पोहोचवितच आहोत. तो आणखी बुलंद करू असं या वेळी आमदार देशमुख यांनी स्पष्ट केलं. गरजवंत सकल मराठा क्रांती मोर्चाच्या बॅनरखाली निवेदन देण्यासाठी गेलेल्या मराठा आंदोलकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ता धैर्यवर्धन पुंडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांचा समावेश होता. काही राजकीय कार्यकर्तेही या वेळी होते. त्याच्यावर तेवढा देशमुख यांचा आक्षेप होता. मात्र, हा वाद वेळीच शांत झाला. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार विप्लव बाजोरिया आणि भाजपचे आमदार वसंत खंडेलवाल यांनी हे आंदोलकांच्या संपर्काबाहेर होते. भाजपचे आमदार रणधीर सावरकर हे घरी नसल्यानं त्यांच्या वडिलांनी निवेदन स्वीकारले.

(Edited by : Prasannaa Jakate)

Maratha Protest in Akola infont of MLA Nitin Deshmukh's Residence.
Protest in Akola : वादानंतर ग्रामस्थांची अशीही युक्ती; भाजपच्या आमदाराला गावात पाय न ठेवण्याची सक्ती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com