Vijay Wadettiwar In Amravati : आरोग्यमंत्र्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का ? वडेट्टीवारांचा संताप, काय आहे कारण ?

Amravati Civil Hospital : अमरावती रुग्णलायतील वीज गायब, गर्भवतींसह बाळांना धोका
Vijay Wadettiwar, Amravati Hospital
Vijay Wadettiwar, Amravati HospitalSarkarnama

Amravati Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील शासकीय रुग्णालयातील १८ रुग्णांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच अमरावती रुग्णालयातील गंभीर प्रकार समोर आला आहे. या रुग्णालयातील गेल्या वीज तीन तासांहून अधिक काळ गायब आहे. यामुळे रुग्णलायात काळोखाचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे मात्र जिल्हा प्रशासनाचे लक्ष नसल्याने विरोध पक्षनेते विजय वडेड्डीवरांना संताप अनावर झाला आहे. (Latest Political News)

अमरावती (Amaravati) जिल्हा स्त्री रुग्णालय येथे मागील तीन तासांपासून वीजपुरवठा खंडित झाल्याचे समोर आले आहे. यामुळे येथील गर्भवती महिला व लहान बाळांचे हाल होत आहेत. परिणामी त्यांना धोकाही निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाने लाईनचे काम सुरु असल्याचे सांगून प्रकरणाचे गांभिर्याकडे दुर्लक्ष केले. या रुग्णालयात सध्या २५० गर्भवती महिला दाखल आहेत. वीज नसल्याने गरमीने रुग्ण हैराण झाले आहेत.

Vijay Wadettiwar, Amravati Hospital
Chhagan Bhujbal On Onion : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी छगन भुजबळ सरसावले; केली मोठी घोषणा !

दरम्यान, अमरावती दौऱ्यावर असलेल्या राज्याचे विरोधी पक्षनेते (Vijay Wadettiwar) विजय वडेट्टीवारांनी या प्रकरणी जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले. त्यांनी जिल्हास्तरी रुग्णालयाला भेट देऊन संताप व्यक्त केला. रुग्णालयातील वीज खंडीत होऊन काही दुर्दैवी प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Vijay Wadettiwar, Amravati Hospital
Beed News : कृषी मंत्र्यांच्या परळीत मिळेना पूर्णवेळ तहसिलदार ; दोन महिन्यात चार...

एका मंत्राकडे पाच-पाच जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा भार आहे असल्याने असे प्रकार घडत आहेत. याकडे कुणाचेही लक्ष नाही. वीज नसल्याने उपचारात अडथळे येऊन कुणाच्या जीवाचे बरे-वाईट झाल्यास आरोग्यमंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा लागेल. लोकांना गृहीत धरून जे राज्य चालवले जात आहे. ही जी सत्तेची मस्ती आहे, ही या ठिकाणी दिसून येते", अशा शब्दात वडेट्टीवारांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com