Vijay Wadettiwar : वडेट्टीवारांनी सांगितल्याप्रमाणे पोंभुर्णात काँग्रेसचे वर्चस्व, गोंडपिपरीत भाजप !

Subhash Dhote : सुभाष धोटे यांच्या क्षेत्रातील गोंडपिपरी येथे भाजपने सर्वाधिक १२ जागा जिंकल्या.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama

Chandrapur District's APMC Election Results : जिल्ह्यातील गोंडपिपरी, पोंभुर्णा आणि भद्रावती येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठी निवडणूक झाली. त्यानंतर झालेल्या मतमोजणीत धक्कादायक निकाल समोर आले. कॉंग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांच्या क्षेत्रातील महत्त्वाचा तालुका असलेल्या गोंडपिपरी येथे भाजपने सर्वाधिक १२ जागा जिंकत बाजार समितीवर आपले वर्चस्व सिद्ध केले. (What Vijay Vadettivar had believed, it came true)

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदार संघातील पोंभुर्णा येथे काँग्रेसने बाजी मारत १२ जागांवर विजय प्राप्त केला आहे. पोंभुर्णा बाजार समितीच्या १८ संचालकपदासाठी काल मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान पार पडले. त्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली. माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांनी परवा ‘सरकारनामा’शी बोलताना पोंभुर्णावर ‘शतप्रतिशत’ कॉंग्रेस निवडून येईल, असा विश्‍वास व्यक्त केला होता, तो खरा ठरला.

व्यापारी गटात भाजपचे सुनील कटकमवार, राकेश गव्हारे, ग्रामपंचायत गटात भाजपचे रवी गेडाम, निलेश चिंचोलकर, डॉ. नितेश पावडे, धनराज सातपुते, मापारी गटात काँग्रेसचे विनायक बुरांडे, सहकार गटात काँग्रेसचे विलास मोगरकर, आशिष कावटवार, रवी मरपल्लीवार, वासुदेव पाल, वसंत पोटे, विनोद थेरे, प्रवीण पिदुरकर, प्रफुल्ल लांडे, अशोक साखलवार, भारती बंधन, सुंनदा गोहने विजयी झाले आहेत.

गोंडपिपरीत भाजप..

गोंडपिपरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप समर्थीत पॅनलने अठरापैकी बारा जागा जिंकत काँग्रेसचा पराभव केला. काँग्रेसला केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत (APMC Election) भाजपचे सुहास माडुरवार, रितेश वेगीनवार, विजय पेरकावार, संदीप पौरकर, समीर निमगडे, चंद्रजीत गवारे, गणपती चौधरी, संजना अम्मावार, स्वप्निल अनमुलवार, इंद्रपाल धुडसे, निलेश पुलगमकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) महेंद्रसिंग चंदेल विजयी झाले.

Vijay Wadettiwar
Amravati APMC Election News : राणांना नाही जमली सहकाराची गोळाबेरीज, यशोमतींनी उडवला धुव्वा !

काँग्रेसचे (Congress) नीलेश संगमवार, देविदास सातपुते, अशोक रेचनकर, प्रेमीला चनेकर, संतोष बंडावार, नारायण वाग्दरकर विजयी झालेत. स्थापनेपासून बाजार समितीवर काँग्रेसची एकहाती सत्ता होती. पण आता भाजपने (BJP) काँग्रेसचे (Congress) पानिपत करीत ऐतिहासिक विजय मिळविला. कॉंग्रेसचा हा पराभव आमदार सुभाष धोटे यांना मोठा धक्का मानला जात आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com