Vijay Wadettiwar : जाहिरातीचं काय घेऊन बसला; महायुतीचं सरकारच आता बेपत्ता होणार!

Maharashtra Govt Ad : तीर्थक्षेत्र योजनेच्या सरकारी जाहिरातीवर तीन वर्षांपासून बेपत्ता व्यक्तीचा फोटो असल्याने विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News : तीर्थक्षेत्र योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरीच्या जाहिरातीत एका बेपत्ता व्यक्तीचा फोटो प्रकाशित केल्याने सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकावर चांगलीच टीका होत आहे. यावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हे सरकार लवकरच बेपत्ता होणार आहे. जाहिरातीच्या माध्यमातून याची तयारी मुख्यमंत्री करीत असल्याची मिश्किल टिपण्णी केली.

तीर्थक्षेत्र योजनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळांच्या भेटीसाठी 30 हजारापर्यंतचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. सोबतच 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकासोबतच्या एका सहकारी व्यक्तीचाही खर्च सरकार उचलणार आहे. याची जाहिरात शिवसेनेच्यावतीने केली जात आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांसह एका ज्येष्ठ नागरिकांचा फोटो प्रकाशित करण्यात आला आहे. आता जाहिरातीत दाखवण्यात आलेली व्यक्ती ही तीन वर्षांपासून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे.

या जाहिरातीवर वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांनी पराभवाच्या भीतीने महायुती सरकाराला काही सुचेनासे झाले असल्याचे सांगितले. रोज नव्या योजना जाहीर करून आपल्याकडे लक्ष वेधून घेत आहे. जे जे प्रयोग करायचे ते सर्व महायुती सरकार करीत आहे. मात्र आता वेळ निघून गेली. मात्र याचा आता काही फायदा होणार नाही. जनतेनी महायुती सरकारला पराभूत करण्याचे निश्चित केले आहे.

Vijay Wadettiwar
Shivsena UBT : छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा आता एकच नेता? शिवसंकल्प मोहिमेपासून चंद्रकांत खैरे हात राखून

लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेनी महायुतीला दणका दिला आहे. आता विधानसभेत या सरकारालाच राज्यातून बेपत्ता करणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. महायुती सरकाराच्या पापाचा घडा भरला आहे. पापपत्रातून यांच्या पापाचा घडा आणि केलेले पाप आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत.

किती कोटीचे टेंडर काढून किती कोटीचे कमिशन खाल्ले, बजेटमध्ये दाखवलेल्या आदिवासी विभागाचे पैसे खर्च करायचे नाही आणि ते दुसरीकडे वळवायचे ही सर्व पापे पापपत्रात आम्ही दाखवणार असल्याचे इशाराच वडेट्टीवार यांनी दिला आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांच्या नावाचा प्रस्ताव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी वरिष्ठ नेत्यांकडे सादर केला आहे. लवकरच त्यांची नावे जाहीर करून कारवाई केली जाणार आहे. आता कोणाला पाठिशी घालायचे नाही असे पक्षाने ठरवले असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

Vijay Wadettiwar
Sharad Pawar Vs Ajit Pawar : बारामतीवरून शरद पवारांचा प्रश्न, अजितदादांनीही दिलं उत्तर; पुण्यातील बैठकीत काय झालं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com