Vijay Wadettiwar : नाचणाऱ्यांना अंगण कमी पडत आहे, वडेट्टीवारांचा रोख कुणाकडे ?

Mahayuti Leaders : महायुतीमधील क्रमांक दोनचे नेते आमच्याकडे येणार.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Vijay Wadettiwar : महायुतीमध्ये तीन पक्षांच्या मारामारीत एवढी गर्दी झाली की, तेथे जागा शिल्लक नाही. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये जे लोक क्रमांक दोनवर होते, त्यांना आता विश्‍वास राहिलेला नाही. आपल्याला उमेदवारी मिळेल, ही त्यांची आशा धूसर झाली आहे. असे सर्व लोक आता आमच्या संपर्कात आहेत, असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

आज (ता. 23) सकाळी वडेट्टीवार नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, महायुतीमधील दोन पक्षांचे लोक आमच्या संपर्कात आहेत आणि दिवसागणिक ती रांग लांब होत चालली आहे. तिकडे महायुतीमध्ये त्यांच्या लोकांना नाचायला अंगण कमी पडत आहे. त्यामुळे ते दुसरे अंगण शोधत आहेत. कॉँग्रेसचे मोठे नेते आमच्याकडे येणार आहेत, असा दावा भाजप नेते करतात. याबद्दल विचारले असता, तिकडे सर्व उपरे जमा झाले आहेत, असे म्हणत त्यांनी माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्यावर हल्ला चढवला.

आशिष देशमुख यांचे वडील रणजित देशमुख हे काँग्रेसचे सच्चे शिपाई. त्यांच्याच नावाने आशिष देशमुख यांनी लांबलचक भाषणे केली. त्यानंतर भाजपमध्ये गेले, पण तेथे ते रमले नाहीत. पुन्हा काँग्रेसमध्ये आले, येथे त्यांना काही गवसले नाही. त्यामुळे पुन्हा काँग्रेसचे दार ठोठावत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar : डॉक्टरांच्या संपाबाबत सरकार अद्यापही गंभीर नाही; रुग्णांचे हाल

यात्रेमध्ये जाणारे तीन प्रकारचे लोक असतात. त्यामध्ये हौसे, गवसे, नवसे लोक असतात. काही हौस म्हणून जातात, काही काहीतरी गवसते का, यासाठी जातात तर काही लोक नवस बोलण्यासाठी किंवा फेडण्यासाठी जातात. डॉ. आशिष देशमुख यातील नेमके कोणत्या प्रकारातील आहेत, याचा उलगडा आजपर्यंत झाला नाही, असे म्हणत वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली.

एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर संपली..

ज्यावेळी एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपसोबत गेली, त्यावेळेस त्यांची बार्गेनिंग पॉवर संपली. त्यांना आता भाजप नेत्यांच्या दयेवर जगावं लागत आहे. यापुढेही त्यांना असंच जगावं लागेल. त्यामुळे शिंदे गटाला आता मनाप्रमाणे जागा मिळणार नाहीत. लोकसभा निवडणुकीत ज्या जागा ते मागत आहेत, त्या जागांची तृप्ती होणार नाही. रामटेक, परभणी यांसह इतर जागा आहेत. या सगळ्या जागांचा घोळ सुरू आहे. शिंदे गटाला आठ नऊच्या पलीकडे जागा देण्याची भाजपची मानसिकता नाही.

राष्ट्रवादीला चार ते पाच जागा आणि शिंदे गटाला आठ ते नऊ जागा भाजप देईल, अशी आतली माहिती आमच्याकडे आहे. भाजप 34 जागांवर लढण्याच्या तयारीत आहे. त्यात शिंदे व पवार काहीच बोलू शकणार नाही. कारण दिल्लीचा आदेश यांच्यासाठी अंतिम असतो. आपल्या डोक्यावरचा फेटा, पगडी कधीच त्यांच्या पायावर नेऊन ठेवत दिल्ली दरबारी अर्पण करून आले आहेत. तुम्ही म्हणाल तेच करू आणि तुमचे शब्द पडू देणार नाही, असा अलिखित करार करून महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे पुढे या लोकांचं काही खरं नाही, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

Edited By : Atul Mehere

R

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar : सरकार निवडणुकांची वाट पाहतेय का? कांदा निर्यातबंदीवरून वडेट्टीवार यांचा सवाल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com