Vijay Wadettiwar News : राजकारणात सर्वांचीच घरे काचेची असतात, असं का म्हणाले वडेट्टीवार?

Vijay Wadettiwar Statement: ''...म्हणून मग बजरंगबलीचाही आधार घेतला!''
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama

Vijay Wadettiwar's Statement on BJP : कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारात भाजप नेते आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३०पेक्षा जास्त सभा घेतल्या, रोड शो केले. येवढे करूनही काम जमले नाही, म्हणून मग बजरंगबलीचाही आधार घेतला. पण याचा काहीच फायदा भाजपला होणार नाही, असे माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले. (But this will not benefit BJP)

आज (ता. ९) सकाळी नागपूर विमानतळावर आमदार वडेट्टीवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, विकासाच्या मुद्द्यावर भाजपला जनमत मिळणार नाही म्हणून शेवटी बजरंगबलीचा आधार घेतला. ४० टक्के भ्रष्टाचार सुरू असल्याने जनता आता भाजपला मतदान करणार नाही. भाजप हारत असल्याने त्यांच्यावर ही वेळ आली आहे.

..तर सर्वावरच कारवाई करावी लागेल !

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकींमध्ये बव्हंशी ठिकाणी कॉंग्रेस-भाजप अशी युती झाली. चंद्रपुरात भाजप आणि कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना एकत्र येऊन निवडणूक लढवली. त्यावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रपूर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना पदावरून हटवले. यावर बोलताना आमदार वडेट्टीवार म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका राजकीय पक्षाच्या चिन्हावर होत नाहीत.

आपसात ताळमेळ करून त्या लढल्या जातात. कारवाई करायची झाल्यास सर्वांवर कारवाई करावी लागेल. सहकार क्षेत्रांत कारवाई करत असताना ती विचार करून केली पाहिजे, असे म्हणत त्यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना नाव न घेता टोला लगावला.

Vijay Wadettiwar
Shivani Wadettiwar Political Journey: सावरकरांवरील वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या शिवानी वडेट्टीवार कोण आहेत ?

राज्यात अनेक ठिकाणी अभद्र युती झालेली आहे. त्यामुळे आता सर्वांवर कारवाई केली जाणार आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. साई रिसॉर्टप्रकरणी दिलासा मिळाला आहे. केवळ आरोप करून कोणाला फसवले जाऊ शकत नाही. राजकारणात सर्वांचीच घरे काचाची असतात, हे लक्षात ठेवले पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले.

लिहिताना संयम ठेवावा..

संजय राऊत (Sanjay Raut) नेहमी सामनाच्या अग्रलेखातून महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांचे कान टोचत असतात. याबाबत विचारले असता, सर्वांनी संयम ठेवून बोलावे, महाविकास आघाडीचा जोड थोडा ढिला झाला होता, पण आम्ही फेविकॉल लावून तो जोडत जाऊ. भविष्यात महाविकास आघाडीचे दिवस आहे. महाविकास आघाडी तोडण्याची भाषा करू नये, जोडण्याची भाषा करावी. लिहिताना, बोलताना संयम ठेवावा, असा सल्ला आमदार वडेट्टीवार यांनी राऊतांना दिला.

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar : 'नीरव मोदी आणि ललित मोदी दोघंही ओबीसीचे मोठे नेते'; वडेट्टीवारांनी उडवली भाजपच्या आंदोलनाची खिल्ली

राज्यात (Maharashtra) सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर बोलताना ढोल, ताशे वाजत असले तरी आता ते बंद होणार आहेत. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयातून (Supreme Court) येणार आहे. त्यामुळे सध्यातरी त्यावर कुणी भाष्य करू नये. पण जो काही निर्णय न्यायालय देईल, त्याचा सर्वांनी आदर केला पाहिजे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com