Vijay Wadettiwar News : गाड्या काय फोडता, सभा घेऊन निखिल वागळे यांचे मुद्दे खोडून काढा ना…

Maharashtra Is Becoming Bihar : सत्तेतील गुन्हेगारी आवरली नाही तर बिहार परवडला पण महाराष्ट्र परवडणार नाही.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Vijay Wadettiwar News : निखिल वागळे ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमाला जात असताना त्यांच्या गाडीवर हल्ला करून गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. या घटनेचा राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निषेध केला आहे. ‘गाड्या काय फोडता, हिंमत असेल तर निखिल वागळे यांचे मुद्दे खोडून काढा ना...’ असे आव्हान वडेट्टीवार यांनी दिले आहे.

आज सकाळी नागपुरात वडेट्टीवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, निखिल वागळे यांच्यावरील हल्ला म्हणजे राज्यात गुंडा राज सुरू झाल्याचे द्योतक आहे. सत्ताधारीच कायदा हातात घेत आहेत. त्यातही सत्ताधाऱ्यांमध्ये स्पर्धा लागल्या आहेत. तिघे जण वेगवेगळे आदेश पोलिसांना देतात. त्यावेळी पोलिसांपुढे मोठा प्रश्‍न असतो की आम्ही काय करायचं? एका घटनेमध्ये तिघांचे वेगवेगळे स्टेटमेंट्स येतात, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला.

Vijay Wadettiwar
बाबा सिद्दिकींनी काँग्रेस सोडली, वडेट्टीवारांनी राग अजितदादांवर काढला | Vijay Wadettiwar |

घोसाळकरांच्या प्रकरणावर वडेट्टीवार म्हणाले की, धमकी देणार कधी मारत नसतो आणि मारणारा कधी धमकी देत नसतो. मारणाऱ्याने घोशाळकरांना प्रेमाने बोलावून घेतले आणि मारले. धमकी ही पोकळ असते. तरीही छगन भुजबळ ओबीसीचे नेते म्हणून लढत आहेत. अशा परिस्थितीत त्यांची काळजी घेणे, हे सरकारचे काम आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

म्हणून मुख्यमंत्री फोटो काढण्यास घाबरत होते..

संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गुंडासोबतचा फोटो समोर आणला. त्यामुळेच काल मुख्यमंत्री फोटो काढताना घाबरत होते. मुख्यमंत्र्यांच्या जवळ पोहोचण्याची गुंडांची हिंमत होतेच कशी? गुंड त्यांच्या घरापर्यंत, त्यांच्या कार्यालयापर्यंत कसे जाऊ शकतात? मंत्रालयापर्यंत कसे जातात? त्यांना घेऊन जाणारा कोण असतो, त्यांचीही चौकशी झाली पाहिजे. भविष्यात अशा प्रवृत्तींना दूर ठेवणे गरजेचे आहे.

कुणाच्या बापाला घाबरण्याची गरज नाही..

मनोज जरांगे यांनी पहिले ढोल ताशे वाजवले, गुलाल उधळला, फुलांचा वर्षाव करून घेतला. त्यामुळे आता पुन्हा उपोषणाला बसण्याची गरज काय? मराठ्यांच्या आरक्षणाला मी कधीच विरोध केला नाही. पण ओबीसींच्या ताटातलं काढून घेऊ नका, ही आमची भूमिका काल होती, आज आहे आणि उद्याही राहणार आहे. त्यासाठी कुणाच्या बापाला घाबरण्याची गरज नाही. या सरकारने तिकडे देत असताना जे परिपत्रक काढले. ते परिपत्रक आंदोलन मागे घेताना त्यांना समजले नाही का, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com