Vijay Wadettiwar : गुंडांना चमकोगिरी करण्यासाठी मंत्रालय खुले करून देणारे सरकार

Congress On Mahayuti : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Mantralay Politics : पुण्यातील गँगस्टर नीलेश घायवळचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीचा फोटो संजय राऊत यांच्याकडून ट्विट केल्यानंतर राजकारण तापले आहे. राऊत यांच्या हल्ल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे.

गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी महायुतीमध्ये गुंडांची जोरदार भरती सुरू आहे, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर आपली भूमिका मांडत सरकारवर टीका केली. त्यानंतर वडेट्टीवार यांनीही सरकारवर निशाणा साधला.

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar News : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका ; म्हणाले, 'मर्जीतील अधिकाऱ्यांचे...'

वडेट्टीवार म्हणाले, गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहेत. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात एसीची हवा घेत आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर दिवसभर रांगेत उभा आहे. पेपरफुटी विरोधात तरुण तरुणी रस्त्यावर आंदोलन उपोषणात आपले आयुष्यातील महत्त्वाचे दिवस घालवत आहे. नागपुरात आदिवासी बांधव आपल्या मागण्यासाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करीत आहेत आणि इकडे सरकार गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले करून देत असल्याचे वडेट्टीवार यांनी नमूद केले आहे.

हिच का ती ‘मोदी की गॅरंटी?’ असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अजितपवारांना वडेट्टीवारांनी आपल्या ट्विटमध्ये टॅग केले आहे. मुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव, उपमुख्यमंत्री, त्यांचे चिरंजीव यांनी गेल्या काही दिवसांत गुंडांची भेट घेतल्याचे आरोप झालेत. त्यावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. आमदार गणपत गायकवाडांच्या गोळीबार प्रकरणानंतर राज्यातील राजकारणातील गुन्हेगारीवर चर्चा होऊ लागली आहे. विदर्भातही अनेक ठिकाणी राजकीय गुन्हेगारीची प्रकरणे उघडकीस येत आहेत. त्यामुळे विरोधकांनी सरकारला घेण्याचा प्रयत्न केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पार्थ पवारांनी गुंडाची घेतलेली भेट असो की श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसानिमित्त पुणे शहरातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने त्यांना शुभेच्छा दिल्या. यावरुन विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अशात वडेट्टीवार यांनीही सरकारला घेरले आहे. निवडणुकीआधी महायुतीत गुंडांची भरती जोरात सुरू आहे. निवडणुकीपूर्वी सत्तेतील तीनही पक्षात स्वतःची ‘गँग’ मजबूत करण्यासाठी जबरदस्त स्पर्धा करीत आहेत. मुख्यमंत्री पुत्राची वर्षा बंगल्यावर हेमंत दाभेकरशी भेट. मुख्यमंत्र्यांची नीलेश घायवाळ सोबत भेट, अशी टीका काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पिंपरी चिंचवडमधे गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या आसिफ महम्मद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढीशी भेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाची गजा मारणेशी घरी जाऊन भेट. गुंडांचे आदरातिथ्य करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून जनतेने कायदा व सुव्यवस्थेची अपेक्षा कशी करावी, असा सवालही काँग्रेसकडून विचारला जात आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar : सत्ताधारी आमदारच कायदा हातात घेत असतील तर काय बोलणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com