Vijay Wadettiwar : शरद पवारांनी ज्यांना मोठं केलं, तेच त्यांना सोडून गेले; काय वाटत असेल त्यांना?

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबी हटवली, असा प्रचार केला जात आहे.
Vijay Wadettiwar and Sharad Pawar
Vijay Wadettiwar and Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News : महाराष्ट्रात पंतप्रधानांचा हा तिसरा दौरा आहे. हे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेलं आहे. या सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. म्हणून मोदींना वारंवार महाराष्ट्रात यावं लागतं. गेलेली पत सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दौरा करत आहेत. या सर्वांचे लक्ष विकासाकडे नाही, तर स्वतःची चुंबळी भरण्याकडे आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्राचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

आज (ता. १९) नागपुरात वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राजकारणात कर्तृत्ववान लोकांना फार संधी मिळत नाही, असा विषय शरद पवार यांचा मनात असू शकतो. पण तो त्यांचा अंतर्गत आहे, त्यावर मी बोलणार नाही. शरद पवार यांनी मोठी केलेली माणसे आज त्यांच्याबरोबर नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर पक्ष फुटला. मात्र पवार हे हयात असताना त्यांचा पक्ष फुटला. ज्यांना त्यांनी मोठं केलं ते सोडून गेले. हे शरद पवार यांच्या मनातील शल्य नक्कीच आहे.

Vijay Wadettiwar and Sharad Pawar
Nagpur : सरकारने नियुक्त्या करताना विचार करावा... असं का म्हणाले वडेट्टीवार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबी हटवली, असा प्रचार केला जात आहे. याबाबत विचारले असता, 85 कोटी लोकांना पाच रुपये किलो धान्यावर निर्भर राहावं लागत असेल, तर गरिबी हटली की वाढली, हे देशाच्या भाजप सरकारलाच माहीत. गडचिरोलीमध्ये विभागीय मेळावा होत आहे. अनेक वर्षांपासून गडचिरोली कॉंग्रेसचा गड राहिलेला आहे. चंद्रपूरसुद्धा काँग्रेसचा गड आहे. पक्षाची मोठी ताकद तेथे आहे. गडचिरोलीत होणारा मेळावा काँग्रेसला लोकसभेची निवडणूक जिंकण्यासाठी बळ देणारा ठरेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारच्या धोरणात शिक्षणाबद्दल अनास्था आहे. शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. विशिष्ट वर्गातील लोकांना संधी मिळते आणि गरिबांना वंचित राहावं लागतं. जेवढ्या जागा रिक्त आहेत, त्यातून शिक्षणाची अधोगती दिसून येते. केंद्र सरकारच्या नवीन निर्णयामुळे बेरोजगार चार मुलांना शिकवून स्वतःचं कुटुंब चालवत होते. ती संधीसुद्धा हिरावून घेत रस्त्यावर भीक मागायला लावण्याची कार्यप्रणाली केंद्र सरकारने शोधून काढली असल्याचा घणाघात वडेट्टीवार यांनी विद्यार्थी कायद्याबाबत बोलताना केला.

विधिमंडळात चित्रपट दाखवणार आहे. असं करता येतं का, हे तपासून पाहावं लागेल. विधानसभाध्यक्षांनी दिलेले निकाल पाहता ते संविधानाला, कायद्याला धरून नाही. कायदे मोडीत काढण्याचा धंदा जोरात सुरू आहे, असे ते विधिमंडळात अटल चित्रपट दाखवला जाणार असल्याबाबत बोलले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दावोसला जायला पैसे आहेत. अंगणवाडी सेविकांना मानधन देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. कंत्राटांच्या किमती वाढवून लुटण्यासाठी पैसे आहेत. विनाटेंडरने काम देण्यासाठी पैसे आहेत, पण अंगणवाडी सेविकांसाठी नाही. सरकारला अंगणवाडी सेविकांचा प्रश्न सोडवण्यामध्ये स्वारस्य नसेल तर अंगणवाडी सेविका गावातील शंभर मते फिरवू शकते, याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील.

Edited By : Atul Mehere

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com