Vikas Thakre : कॉंग्रेसच्या आमदारांकडून मेट्रोमॅन दीक्षितांच्या चौकशीची मागणी !

Nagpur Metro : दीक्षितांसारख्या अधिकाऱ्यावर कॅगसारख्या संस्थेने शंका व्यक्त केली आहे
Vikas Thakre and Brajesh Dikshit
Vikas Thakre and Brajesh DikshitSarkarnama
Published on
Updated on

MLA Vikas Thakre on Bragesh Dikshit : गेल्या आठ वर्षांपासून मेट्रोचा कारभार ब्रजेश दीक्षितांकडे आहे. काम करीत असताना त्यांनी आपल्या कामात अनेक अनियमितता केल्या. त्यामुळे त्यांच्यावर कॅगने ठपका ठेवला. मागच्या अधिवेशनातसुद्धा हा मुद्दा मी उपस्थित केला होता. दीक्षितांसारख्या एखाद्या अधिकाऱ्यावर कॅगसारख्या संस्थेने शंका व्यक्त केली आहे, असे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी म्हटले. (He made many irregularities in his work)

आज (ता. १६) नागपुरात पत्रकारांशी बोलताना आमदार ठाकरे म्हणाले, ब्रजेश दीक्षित यांना पुन्हा मुदतवाढ देणे, योग्य नाही. अशा माणसाला मुदतवाढ देऊच नये. कॅगच्या अहवालात जी अनियमितता दाखवण्यात आली आहे, त्याची चौकशी व्हायला पाहिजे. पण ती चौकशी न होता, त्यांना बढती दिली जाणार होती. त्यामुळे नाइलाजाने मुख्यमंत्र्यांना, पंतप्रधानांना पत्र लिहावे लागले.

एका मंत्र्याने असं काही केलं, तर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल होतो आणि त्याला जेलमध्ये जावं लागतं. मग एका अधिकाऱ्याच्या कामावर कॅगने ताशेरे ओढले असताना, त्याच्यावर अनियमिततेचा ठपका ठेवला असताना त्याला सुरक्षा का? त्याची चौकशी व्हावी, ही माझी मागणी होती, असे आमदार ठाकरे म्हणाले.

मी केलेली मागणी आता पूर्ण झालेली आहे. पण आता कॅगने जो ठपका ब्रजेश दीक्षित याच्यावर ठेवला, त्याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, आता ही माझी पुढची मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण झाली नाही, तर विधानसभेत मी हा मुद्दा पेटवणार आहे, असे आमदार ठाकरे यांनी सांगितले.

Vikas Thakre and Brajesh Dikshit
शिवसेनेच्या फोडाफाडीबाबत समन्वय समितीने निर्णय घ्यावा : विकास ठाकरे

ब्रजेश दीक्षित यांनी निर्धारित वेळेत कामे पूर्ण केली नाहीत. परिणामी त्या कामांचा खर्च वाढला. मर्जीतल्या ठेकेदारांना कामे देणे, अनियमितता करणे, अशा अनेक गोष्टी कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आल्या आहेत. हा अहवाल सीबीआयकडे (CBI) दिला, तर त्याची चौकशी होईल आणि ही चौकशी झालीच पाहिजे, असे आमदार ठाकरे म्हणाले.

राज्याच्या (Maharashtra) मंत्र्याची चौकशी केली जाते, त्याला जेलमध्ये टाकले जाते. तर मग एका अधिकाऱ्याने तसेच काम केले असताना त्याची चौकशी का होऊ नये, त्याला जेलमध्ये का टाकू नये, असा प्रश्नही आमदार ठाकरे यांनी उपस्थित केला. ब्रजेश दीक्षितांची चौकशी करावी, यासाठी हा मुद्दा येत्या अधिवेशनात विधानसभेत उचलून धरणार आहे. तोपर्यंतही याचा पाठपुरावा मी करत राहणार आहे. आता दीक्षितांना मुदतवाढ दिली नाही, हे चांगले झाले. पण गुन्हा केल्यानंतर त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे.

दीक्षितांवर मी आक्षेप घेतला किंवा एखाद्या संस्थेने घेतलेला नाही, तर कॅगने तो गंभीर आक्षेप घेतलेला आहे. त्यामुळे दीक्षितांची चौकशी झालीच पाहिजे. किती कोटीचे नुकसान झाले, ते चौकशीअंती कळणार आहे. त्यामुळेच ब्रजेश दीक्षितांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली, असे आमदार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com