Vinayak Raut News : भाजप नेत्यांसारखे बकवास करणारे आमच्याकडे नाहीत, नागपुरात दुप्पट लोक असतील !

Sunil Kedar : सभेची जबाबदारी आमदार सुनील केदार यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
Vinayak Raut and Balu Dhanorkar
Vinayak Raut and Balu DhanorkarSarkarnama
Published on
Updated on

Mahavikas Aghadi's Meeting in Nagpur : महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. तयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव विनायक राऊत काल रात्री नागपुरात आले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, संभाजीनगरच्या सभेपेक्षाही दुप्पट लोक नागपुरातील वज्रमुठ सभेला येतील. (Twice as many people will attend the Vajramuth Sabha in Nagpur)

सभेच्या तयारीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते अपार श्रम घेत आहेत. या सभेची जबाबदारी कॉंग्रेस नेते माजी मंत्री आमदार सुनील केदार यांच्यावर सोपवण्यात आली आहे आणि ते मन लावून यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या पोटात गोळा उठला आहे. संभाजीनगरची सभा होऊ नये, यासाठी आधी सत्ताधाऱ्यांनी जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीची नागपुरात ताकद पाहिल्यावर सत्ताधाऱ्यांची नौटंकी सुरू झाली आहे.

या सभेला अपशकून करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा आहे. नागपूरच्या दर्शन कॉलनीतील मैदानावरची येत्या रविवारी होणारी सभा यशस्वी होणारच आणि राज्याच्या पुढच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारी ही सभा ठरणार आहे. या मैदानावर किमान ७० हजार लोकांचा समुदाय बसलेला असेल. इमारती आणि बाहेर रस्त्यावरती एकूण लाखभर लोक उपस्थित असतील.

महाविकास आघाडीमध्ये सुसंवाद आहे. चंद्रशेखर बावनकुळे किंवा चंद्रकांत पाटील यांच्यासारखे बकवास करणारे आमच्याकडे नाही. शरद पवारांना महाराष्ट्रातच नव्हे तर देशांमध्ये एक महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे त्यांना त्यांचं मत व्यक्त करण्यासाठी कुठलेही बंधन नाही. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेले कुठलेही मत आम्ही सन्मानाने आम्ही स्वीकारतो.

Vinayak Raut and Balu Dhanorkar
Vinayak Raut : 'शिंदे- फडणवीस सरकार म्हणजे काळू- बाळूचा तमाशा'

अयोध्येवरून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार परत आल्यावर पापक्षालन करतील असं वाटलं होतं. पण हे मिंधे मुख्यमंत्र्यांना (Chief Minister) काही लाज नाही. चंद्रकांत पाटील यांना सत्तेची मस्ती एवढी आली आहे, की ते बेताल वक्तव्य करत सुटले आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याबद्दल जराही सन्मान मिंधे मुख्यमंत्र्यांना असेल तर त्यांनी चंद्रकांत पाटलांना त्यांच्या वक्तव्याबद्दल जाब विचारावा, असेही खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com