Vinod Tawde News : ...तर अजितदादांना सोबत घेतलेच नसते; भाजपच्या विनोद तावडेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Bjp Meeting At Nagpur Vinod Tawde Statement : भाजपच्या बैठकीला आलेल्या विनोद तावडे यांनी अजित पवारांबाबत मोठे विधान केले आहे....
 Vinod Tawde Ajit pawar
Vinod Tawde Ajit pawarsarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics News : मुंबईत धारावीवरून एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी मोर्चा काढत भाजपवर हल्लाबोल केला. तर दुसरीकडे भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका केली आहे. भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला आलेल्या तावडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंना टार्गेट केले.

 Vinod Tawde Ajit pawar
Nagpur Winter Session : 'जस्ट वाव... लुक’मध्ये अजितदादांची 'मेट्रो राइड'

विनोद तावडे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय नाट्यमय घडामोडींवर बोट ठेवले. उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत गद्दारी केली नसती तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले नसते, असे मोठे विधान तावडे यांनी केले. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील महायुती 48 पैकी 45 जागा जिंकेल, असा विश्वास तावडे यांनी यावेळी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय म्हणाले विनोद तावडे?

2019 ला विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप-शिवसेना युतीचे सर्वाधिक आमदार निवडून आले होते. पण ऐनवेळी उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी गद्दारी केली. यामुळे एकनाथ शिंदे बाहेर पडले. त्यानंतर अजित पवारही शिंदे-फडणवीस सरकारसोबत आले. उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली नसती तर अजित पवारांना सोबत घेतले नसते, असे तावडे म्हणाले.

''इंडिया' आघाडीत काँग्रेस हेकेखोर'

इंडिया आघातील मित्रपक्ष हे आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा विचारात आहेत. काँग्रेसच्या हेकेखोरपणामुळे आघाडीत फूट पडल्याचा दावा विनोद तावडे यांनी केला आहे.

edited by sachin fulpagare

 Vinod Tawde Ajit pawar
Ajit Pawar News : अजित पवारांनी सभागृहातच आमदार वंजारींना भरला दम; म्हणाले,"...नाहीतर अंगलट येईल!"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com