Wadettiwar In OBC Movement : आजच्या कुणबी-ओबीसी संघटनांच्या आंदोलनात वडेट्टीवारांचा सहभाग !

BJP : ओबीसी ए आणि बी करा, हा पर्याय २०१४ मध्ये भाजपनेच सुचवला होता.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama

Nagpur Maratha - OBC Agitation News : वडेट्टीवारांची भूमिका आम्हाला मान्य नाही, असेही सर्व शाखीय कुणबी - ओबीसी आंदोलन कृती समितीच्यावतीने काल (ता. नऊ) स्पष्ट करण्यात आल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी आज (ता. १०) त्यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, आजच्या कुणबी ओबीसी संघटनांच्या आंदोलनात मी सहभागी होणार आहे, या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. (Make OBCs A and B, this option was suggested by BJP itself in 2014.)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वडेट्टीवार यांच्यावर टिका केली होती. त्याला उत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले, भाजपच्याच नेत्यांनी अकलेचे तारे तोडू नये. ओबीसी ए आणि बी करा, हा पर्याय २०१४ मध्ये भाजपनेच सुचवला होता. चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांनीच हा पर्याय तेव्हा सुचवला होता. मी काही वेगळे बोललेलो नाही.

आज (ता. १०) सकाळी नागपुरात (Nagpur) वडेट्टीवार पत्रकारांशी बोलत होते. ओबीसींच्या (OBC) कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, ही माझी भूमिका आहे. याला माझा विरोध असण्याचे कारण नाही. मराठ्यांना ‘ईडब्ल्यूएस’च्या धर्तीवर वेगळे आरक्षण द्यावे, हा दुसरा पर्यायही मी सुचवलेला आहे. सरकारने मराठा समाजाला पाच वर्षे फिरवले. धनगर समाजाला २०१४ पासून लटकवतच ठेवलेले आहे. दीड वर्षात भाजपने काहीही केले नाही, असा आरोप वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला.

सहकार क्षेत्रावर काँग्रेस राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. यातून अनेक चांगली कामे झाली. मात्र हे वर्चस्व संपवून आपला प्रभाव आणि वर्चस्व वाढविण्याचा हा प्रकार आहे. मात्र सरकार हे पाप करणार आहे. कारण शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे काम बँका करतात. सरकारने त्यांना तसे पोषक वातावरण निर्माण करून दिले पाहिजे. दुर्दैवाने राज्यात सध्या तशी परिस्थिती नाही.

Vijay Wadettiwar
Wadettiwar on Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी ‘ते’ पाऊल स्वतःहून उचलायला पाहिजे होतं !

पुतळ्याचे अनावरण करण्यावरून सरकार घाबरले आहे. मराठा समाजाचे आंदोलन सुरू असताना रोड शो केला जात आहे. हे राज्यातील जनतेला कळत आहे. मराठा समाजासोबत येवढा मोठा दगा झाल्यानंतर आता मराठा समाज ठरवेल, कोणाच्या बाजूने राहायचे आहे. मराठा समाज आता सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवेल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

निवडणुका जवळ येत आहेत. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीत जागा वाटपाचे गणित काय असेल? जागा वाटपावरून आघाडीत वाद आहेत का, असे विचारले असता, जागा वाटपाचा फार्म्युला आम्ही बंदद्वार चर्चा करून ठरवू. तुम्हाला सांगून नाही. पण 100 टक्के फार्म्युला ठरेल आणि योग्य जागावाटप होईल, असा विश्‍वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com