Wadettiwar on Ajit Pawar : उद्धव ठाकरेंच्या सभेत जिवंतपणा होता, तर अजित पवारांच्या सभेत मुर्दाडपणा !

Maharashtra : जनता आता त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही
Uddhav Thackeray, Vijay Wadettiwar and Ajit Pawar.
Uddhav Thackeray, Vijay Wadettiwar and Ajit Pawar.Sarkarnama

Nagpur Political News : बीडमध्ये अजित पवारांच्या सभेत बळजबरीने आणलेली लोक होते. उद्धव ठाकरेंच्या सभेत जिवंतपणा होता, तर अजित पवारांच्या सभेत मुर्दाडपणा होता. तसे ही हे लोक जनतेला काय सांगणार? बेईमानी केली, पक्ष फोडला, जनतेसोबत दगाबाजी केली, हे सांगणार का? हे सर्व जनतेला दिसते आणि जनता आता त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही, असे म्हणत असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार प्रहार केला. (Vijay Vadettiwar attacked the rulers)

आज (ता. २८) सकाळी नागपुरात वडेट्टीवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, यांची आता जिरवायची, असा निर्णय जनतेने घेतला आहे. त्यामुळे त्यांचे आता काही खरे नाही. प्रफुल्ल्ल पटेल यांच्याबाबत बोलताना म्हणाले, कशाच्या भरवशावर पटेल असं म्हणत आहेत? निवडणूक आयोग काय निर्णय देणार आहे, तो निर्णय गुप्त पद्धतीने झालाही असेल आणि तो निर्णय प्रफुल्ल्ल पटेल यांना माहीत असेल म्हणून ते तसे बोलत आहे.

निवडणूक आयोगाने विश्वास गमावला आहे. हा पक्ष बळकावण्याचा प्रयत्न आहे आणि तो केंद्र सरकारच्या आशीर्वादाने होत आहे. तोच विश्वास प्रफुल्ल पटेल यांना आहे. शिंदे फडणवीस सरकार असताना आमच्या आमदारांना निधी मिळत नव्हता. आता अजित पवार अर्थमंत्री झाले असताना फक्त काँग्रेसचे आमदार आणि उद्धव ठाकरे यांच्या आमदारांच्या मतदारसंघात निधीला स्थगिती आहे..

निधीसाठी हावरटपणा..

या सरकारमधील तिन्ही पक्षांत निधीसाठी हावरटपणा सुरू आहे. त्यांच्यात आपापसात भांडण दिसून येत आहेत. भविष्यात हे एकमेकांचे कपडे फाडतील. काही न लपवताना खान प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात नागपूरचे ‘कनेक्शन’ फार मोठे आहे. भाजपचे काही लोक या प्रकरणात गुंतले आहेत. त्यांचा खुनामध्ये सहभाग नसला. तरी सना खानचा वापर अनेक दृष्टीने अनेकांनी केलेला आहे, हे तपासात येईल.

Uddhav Thackeray, Vijay Wadettiwar and Ajit Pawar.
Wadettiwar On Modi : कौतुक व्हायलाच पाहिजे, पण शास्त्रज्ञांच्या कौतुकामागे अजेंडा निवडणुकीचा दिसतोय !

सना खान प्रकरणात ‘बदनाम फरिश्‍ते’..

याप्रकरणी दिशा भरकटवण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे. या प्रकरणाचे जे सूत्रधार आहेत, जे ‘बदनाम फरिश्ते’ आहेत. त्यांना वाचवण्यासाठी सर्व आटापिटा सुरू आहे. सध्याचे सरकार म्हणजे एक बैल एकाच्या गाडीचा, दुसरा बैल दुसऱ्याच्या गाडीचा तर गाडी हाकणारा वेगळाच आहे आणि गाडीचे नियंत्रण वेगळ्याच व्यक्तीचे हातात आहे, असे म्हणत वडेट्टीवार यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला.

शेतकऱ्यांना पॅकेज द्यावेच लागेल..

कोकण सोडून पूर्ण महाराष्ट्रभर दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. खरिपाचे पीक पूर्णपणे नष्ट झाला आहे. कोरड्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई होणार, शेतकऱ्यांचे हाल होणार, हे दिसत आहे. मात्र शासन सभांमध्ये अडकले आहे.

Uddhav Thackeray, Vijay Wadettiwar and Ajit Pawar.
Wadettiwar on BJP : घर चलो अभियान नाही, तर ही अखेरची घरघर; ‘मसीहा’ येताच किती ‘आऊट’ झाले, देशाने पाहिले !

शेतकऱ्यांची थोडीही काळजी असेल तर त्याकडे लक्ष द्या. नाहीतर शेतकरी (Farmers) तुम्हाला राज्यात फिरू देणार नाही. तातडीने दुष्काळ जाहीर करावा. रब्बी हंगामाच्या अनुषंगाने बी - बियाणे खते, अशी तयारी सरकारने (State Government) सुरू केली पाहिजे. शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज द्यावाच लागेल, असे विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com