Wadettiwar on BJP : ‘जागर’ नव्हे बहुजनांची माथी भडकवण्यासाठी भाजपची ‘गाजर’ यात्रा, वडेट्टीवार कडाडले !

BJP : भाजपच्या वतीने महाराष्ट्रभर ओबीसी जागर यात्रा काढण्यात येणार आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News : जात, धर्म, पंथ यांचे प्रलोभन दाखवत समाजामध्ये फूट पाडायची व आपला उल्लू सिधा करून घ्यायचा, ही भाजपची जुनी सवय आहे. महाराष्ट्रात ओबीसी बहुजनांमध्ये जागर निर्माण करण्यासाठी भाजप म्हणे यात्रा काढत आहे. ही जागर यात्रा नाही, तर माथी भडकवण्यासाठी काढण्यात येणारी गाजर यात्रा आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडे‌ट्टीवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला. (On behalf of BJP, OBC Jagar Yatra will be organized across Maharashtra)

भाजपच्या वतीने महाराष्ट्रभर ओबीसी जागर यात्रा काढण्यात येणार आहे. यात्रेच्या आयोजनांमागील हेतूचा वडेट्टीवार यांनी सोमवारी (ता. दोन) चांगलाच समाचार घेतला. भाजपने आजपर्यंत ओबीसी समाजासाठी काहीच केलेले नाही. जातनिहाय जनगणनेच्या मागणीला भाजप आजपर्यंत टाळत आली आहे. ओबीसींसाठी काहीच केलं नाही, म्हणून उपराजधानी नागपुरात ओबीसींनी राज्यव्यापी आंदोलन उभारलं.

चंद्रपुरात अन्नत्याग केला. त्यामुळेच भाजपच्या नेत्यांना धावत यावं लागलं. ओबीसींच्या हाताला काम नाही. रोजगार नाही, नोकऱ्या नाहीत, ओबीसींच्या मुलांना वसतिगृह नाही, घरकुल नाही याकडेही वडेट्टीवार यांनी लक्ष वेधलं. खासगी कंत्राटी पद्धतीने नोकरभरतीचे जीआर काढत ओबीसी, बहुजन तरुणांना संपविण्याचा घाट सरकारने घातला आहे. राज्याचा कारभार चालणाऱ्या मंत्रालयात केवळ साडेबारा टक्के ओबीसी आहेत. त्या घटकांची टक्केवारी वाढलेली नाही.

यात्रेच्या आडून ओबीसी, बहुजन समाजात फूट पाडायची. तरुणांची माथी भडकवायची, असा सत्ताधाऱ्यांना कट असल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली. ओबीसी समाजाने भाजपच्या या खेळीला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेसने नेहमीच ओबीसींच्या हक्कासाठी लढा दिला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी नेहमीच सांगतात, ‘जिसकी जितनी हिस्सेदारी, उसकी उतनी भागीदारी’, त्यामुळे काँग्रेसचं सरकार आल्यावर राहुल गांधी निश्चितच ओबीसी समाजासाठी कार्य करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुंडेंवर घणाघात...

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडै यांच्यावरही वडेट्टीवार यांनी घणाघात केला. नियमितपणे पैसे भरणाऱ्या शेतकऱ्यांची प्रोत्साहनपर रक्कम अद्यापही शिल्लक आहे. मुंडे यांना यायचेच होते तर परिस्थिती पाहून दुष्काळ जाहीर करण्यासाठी यायचे होते. भल्यामोठ्या लव्याजम्यासह ते आलेत आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसून गेलेत. अशा मंत्र्यांचे काय स्वागत करायचं, असा सवाल करीत त्यांनी सर्व सत्ताधाऱ्यांना मतदार जागा दाखवतीलच, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com