Wadettiwar on Fadanvis : फडणवीसांनी माफी मागितली, हे चांगले झाले; म्हणजे हल्ला सरकार पुरस्कृत होता !

Jalna Maratha Protest : आज आंदोलनाचा १३वा दिवस आहे. आता लवकर तोडगा निघाला पाहिजे.
Vijay Wadettiwar and Devendra Fadanvis
Vijay Wadettiwar and Devendra Fadanvissarkarnama

Nagpur Political News : देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या मनाने माफी मागितली, याचा मला आनंद झाला की नाही झाला, हे महत्वाचे नाही. तर मराठा समाजाला आनंद झाला आहे की नाही, हे महत्त्वाचे आहे. शेवटी हल्ला सरकार पुरस्कृत होता, हे आता सिद्ध झालं आहे, असे म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. (Vijay Wadettiwar targeted Deputy Chief Minister Devendra Fadnavis)

आज (ता. ५) सकाळी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, सरकारने आपली चूक कबूल केली, हे आता महाराष्ट्रातील मराठा समाजाला कळून चुकले आहे. हा हल्ला सरकार पुरस्कृत होता, असे म्हणायला आता हरकत नाही. आज आंदोलनाचा १३वा दिवस आहे. आता लवकर तोडगा निघाला पाहिजे. त्यांच्या प्रकृतीची सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे.

समाजासाठी लढणाऱ्या लोकांची काळजी घेणे शासनाची आणि सगळ्यांची जबाबदारी आहे. तोडगा काढण्यासाठी काय करावे, याचा आम्ही फॉर्म्युला सांगितला आहे. तो म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला (OBC Reservation) धक्का न लावता जेवढं वाढवून द्यायचं तेवढं त्यांना द्या. राज्यात (Maharashtra) आणि केंद्रात त्यांचं बहुमताचं सरकार आहे. एका झटक्यात काम होऊ शकते, आता फिरवाफिरवी कशाला करता, असे वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.

मी तर मंचावरून सांगितलं की, वाढवून त्यांना आरक्षण द्या म्हणून. त्यामुळे आज, उद्या तशी भूमिका त्यांची राहिली, तर ओबीसी समाजाची जी भूमिका तीच माझी भूमिका असेल. मी स्पष्ट सांगतोय की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणामध्ये वाढ करा आणि मग हा विचार करा, असे सांगताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका, असा संदेशच वडेट्टीवारांनी दिला.

Vijay Wadettiwar and Devendra Fadanvis
Wadettiwar On Jalna Protest: मराठा समाज ‘जनरल डायर’ला शोधून काढेल, अन् चांगला धडा शिकवेल !

मी ओबीसी कार्यकर्ता आहे. माझ्या जिवात जीव असेपर्यंत ओबीसीच्या मूळ आरक्षणाला अजिबात धक्का लागू देणार नाही. त्यामध्ये माझा जीव गेला तरी चालेल. त्यामुळे सरकारला जी काही सोय करायची ती वेगळी करावी, मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावून लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम सरकारने करू नये.

सरकार एक भूमिका घेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दुसरी भूमिका घेतात, हे काय चाललंय? लोकांना फसवण्याचे काम चालू आहे का? पक्षाचा प्रमुख एक बोलतो आणि सरकार वेगळं बोलते. म्हणजे लोकांच्या डोळ्यात धूळफेक करत आहात का तुम्ही?

एकीकडे दोन्हीकडून मते सावरायची, अशी तुमची भूमिका आहे का? दोन समाजांत भांडण लावण्याची जर बावनकुळेंची भूमिका असेल तर मग मराठा समाज काय समजायचे ते समजेल, असेही वडेट्टीवार म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com