Wadettiwar on Government : वडेट्टीवार संतापले; म्हणाले, आता बघूनच घेऊ सरकार ओबीसींचा हक्क कसा हिरावते !

OBC of Maharashtra : प्रसंगी ओबीसीही आपली ताकद दाखवतील.
Vijay Wadettiwar and Manoj Jarange
Vijay Wadettiwar and Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur OBC Political News : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर ओबीसी समाजाचा आक्षेप नाही. त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. परंतु सरकार जर ओबीसींच्या हक्कावर गदा आणणार असेल, तर बघूनच घेऊ, ते हे कसे काय करतात, असा अल्टिमेटम काँग्रेसचे ज्येष्ठ ओबीसी नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला. (OBCs will also show their strength on occasion)

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सभा घेत आपली ठाम भूमिका जाहीर केली आहे. जरांगे यांच्या घोषणेनंतर राज्यभरातील ओबीसी समाज अलर्ट मोडवर आला आहे. या संदर्भात आज (ता. ६) सकाळी नागपुरात विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका जाहीर केली. आज घेण्यात आलेली बैठक कोणत्याही पक्षाशी संबंधित नव्हती. ओबीसी प्रवर्गातील सर्व संघटनांना बैठकीसाठी बोलावलं होतं.

जरांगे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. या स्थितीत ओबीसी समाजाची भूमिका काय, हे ठरवण्यासाठी बैठक घेण्यात येत आहे. ओबीसी प्रवर्गातील सामाजिक संघटनांची ही बैठक आहे. पक्षापलीकडे जाऊन ओबीसी समाजाच्या हितासाठी ही बैठक आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. दर तीन वर्षांनी क्रिमिलियरची अट वाढवावी. अनेक लोकांचं त्यामुळे नुकसान होणार आहे. आतापर्यंत संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झालेल्या अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालं.

प्रशासकीय सेवेतून वगळणे हा त्यांच्यावर मोठा आघात आहे. त्यामुळे क्रिमिलियरची अट वगळणे आवश्यक आहे. आपल्या न्याय मागण्यांबाबत अनेक ओबीसी संघटनांनी चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीत समाजाचे नुकसान होऊ नये, अशी ओबीसी समाजाची भावना आहे. राजकीय आरक्षण पाहता निवडणुकीत ओबीसींचे आरक्षण अगोदरच कमी झाले आहे, त्यामुळे यावर चर्चा होणार आहे, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

अनेक घटक असलेला ओबीसी समाज आहे. त्यामुळे समाजाची शक्ती ही खूप मोठी आहे. ओबीसी समाज हा गरीब समाज आहे. त्यांचे हक्क कोणी घेऊ नये, अशी ओबीसी समाजाची भावना आहे. परंतु सरकारवर कुणी ओबीसींचे हक्क मारण्यासंदर्भात दबाव आणत असेल, तर आम्हालाही तोच प्रयत्न करावा लागेल, असा इशाराही विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला दिला.

आरक्षणासह अनेक मुद्द्यांवर ओबीसी समाजाने सरकारकडे चर्चेची मागणी केली आहे. परंतु काही लोक ओबीसी समाजाला डावलण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी हे प्रकार तातडीने थांबवावेत; अन्यथा त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. ओबीसी समाज हा शांतताप्रिय समाज आहे. ओबीसींनी कधीही कोणाच्या हक्कावर गदा आणली नाही. भविष्यात तसा कोणताही विचार नाही. परंतु आपली रेष मोठी करण्यासाठी कोणी ओबीसी समाजाचा अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करत असेल तर स्वस्थ बसणार नाही, असा निर्वाणीचा इशारा वडेट्टीवार यांनी या वेळी दिला.

Edited By : Atul Mehere

Vijay Wadettiwar and Manoj Jarange
Wadettiwar On Ajit Pawar : वडेट्टीवारांचे स्फोटक विधान; म्हणाले, अजितदादा 'यूज अँड थ्रो', त्यामुळे...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com