Wadettiwar on Pawar : त्यांना कितीही इमानदारीची भाषा करू द्या, आमच्याकडे पण पुरावे आहेत !

Maratha Reservation : आज होणाऱ्या बैठकीला मी जाणार आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama

Nagpur Political News : सत्तेमध्ये कोण कशासाठी गेलं, सेवेसाठी कोण गेलं, विकासासाठी कोण गेलं, ईडीच्या दबावात कोण गेलं, याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. योग्य वेळी आवश्यकता असल्यास न्यायालयाच्या आदेशापासून सगळं उघड करू, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिला. (I am going to the meeting today.)

आज (ता. ११) सकाळी नागपुरात वडेट्टीवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. विरोधकांना ज्या धमक्या दिल्या जातात, ते आम्ही सहन करणार नाही. तुम्ही कितीही तुमचे पाप लपवले तरी ते लपणार नाही, असे अजित पवारांना उद्देशून ते म्हणाले. आज होणाऱ्या बैठकीला मी जाणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही आमची भूमिका आहे.

मराठ्यांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे. आरक्षण कसे द्यावे, द्यावा हा सरकारचा प्रश्न आहे. बहुमताचे सरकार आहे, त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे. ओबीसीतून आरक्षण नको, ही भूमिका स्पष्ट आहे. सरसकट प्रमाणपत्र देण्यालासुद्धा सर्व महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचा विरोध आहे.

कुणबी आणि मराठा या दोन्ही समाजांत तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. एका समाजाचे आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देता येणार नाही. यासाठी सरकारने मध्यम मार्ग निवडावा आणि मराठा समाजाचा प्रश्न सोडवावा, अशी आमची भूमिका आहे.

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar News : ''काँग्रेसच भारी होती भाऊ... पुढे काँग्रेसलाच साथ देऊ''

आज होणाऱ्या बैठकीत सरकारकडून काय प्रस्ताव येतो, त्यावर चर्चा होईल. मी काही सांगण्यापेक्षा सरकारने (State Government) तो प्रस्ताव कसा मांडावा, काय मांडावा आणि समाजाला आरक्षण द्यावं की नाही, द्यावं आणि द्यायचं झालं तर ते कसं द्यावं, हा सरकारचा प्रश्न आहे. यात योग्य मार्ग काढून यासाठी शासनाने प्रयत्न करावेत.

आगामी निवडणुकीत (Election) मराठा नेत्यांना ठरवून पाडू, असा इशारा काल (ता. १०) अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे देण्यात आला. त्याबद्दल विचारले असता, सद्यःस्थितीत दोन्ही समाजांच्या संघटना आणि नेत्यांकडून इशारे देणे सुरूच आहे. मतभेद होतील, असे इशारे कुणी कुणाला देऊ नयेत. इशारे देऊन प्रश्न सुटणार नाहीत, तर सामंजस्याने सुटणार आहे.

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar यांची ठाम भूमिका, सरकारला दिले हे 2 पर्याय | Maratha Reservation |

दोन्ही समाजांनी समंजसपणा दाखवून कोणी कोणाचं वाईट करणार नाही. या भूमिकेतून पुढे जावं आणि तसाच मार्ग त्यातून काढावा, असे आवाहन मराठा आणि ओबीसी समाजाला वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केले. दोन समाजांत तेढ निर्माण होईल, असं काम कुणी करू नये, असेही ते म्हणाले.

दोन्ही समाजांत वाद निर्माण करण्याचे काम सरकारने सुरू केलं आहे. आरक्षणाच्या नावावर सरकारने धनगर समाजाची फसवणूक केली आहे. आरक्षणाचे गाजर दाखवून ११५ जागा निवडून आणल्या. समाजाची फसवणूक सरकारने केली. टिकाऊ आरक्षण देता येत नसल्यामुळे तकलादू आरक्षण सरकारने दिलं. अध्यक्ष जरी अशोक चव्हाण असले तरी गुलाबराव पाटील, एकनाथ शिंदे सगळे त्या समितीत होते, असे वडेट्टीवार म्हणाले.

कोण मुख्यमंत्री होणार, याचे पोस्टर बॅनर लावण्याचं काम सुरू आहे. ‘फटा पोस्टर निकला हिरो’ असंच काहीसं सध्या सुरू आहे. आता यापुढे कुठे पोस्टरमधून कोण-कोण निघतील. मुख्यमंत्री होण्याची स्पर्धा लागलेली आहे. महाराष्ट्राच्या जनतेला गृहीत धरून बाशिंग बांधून फिरू नका, असा सल्लाही वडेट्टीवार यांनी दिला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com