Washim District BJP : भाजपने जिल्हाध्यक्ष बदलल्यास कुणाची वर्णी, जाधव, राजे, बढे की देशपांडे?

BJP : जिल्ह्यात भाजपमध्ये खांदेपालट होणार असल्याची चर्चा आहे.
Vijay Jadhav, Raju Patil Raje, Shyam Badhe and Yogesh Deshpande.
Vijay Jadhav, Raju Patil Raje, Shyam Badhe and Yogesh Deshpande.Sarkarnama

Washim BJP District President Change News : गल्लीपासून दिल्लीपर्यंत निवडणुकीच्या मैदानात अजेय ठरत असलेल्या भारतीय जनता पक्षाला बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांनी अस्मान दाखविल्याने वाशीम जिल्ह्यात हा पक्ष अजूनही शहरी तोंडवळ्याचा केबिनबेस असल्याचे चित्र समोर आले आहे. (There is talk that there will be a change of District chief in the BJP)

पक्षपातळीवर रिसोड बाजार समिती भाजपच्या खाती जमा झाली असली तरी या बाजार समितीवरील माजी खासदार अनंतराव देशमुख यांचे वर्चस्व कायम राहिले, एवढाच त्याचा राजकीय अर्थ निघत निघतो. आता जिल्ह्यात ग्रामीण भागाशी कनेक्ट असलेले नेतृत्व समोर आणण्याच्या हालचाली भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात वाढल्याने जिल्ह्यात भाजपमध्ये खांदेपालट होणार असल्याची चर्चा आहे.

वाशीम जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे तीनपैकी दोन आमदार आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला. यामध्ये रिसोड बाजार समितीचा अपवाद सोडला तर रिसोड बाजार समितीचा विजय नुकतेच कॉंग्रेस सोडून भाजपवासी झालेले माजी खासदार अनंतराव देशमुख यांचा आहे. कारण या बाजार समितीवर गेल्या चाळीस वर्षापासून अनंतराव देशमुख यांची एकहाती सत्ता आहे.

अनंतराव देशमुख यांनी विजयाचे सातत्य कायम राखल्याने हा विजय भाजपपेक्षा अनंतरावांच्या खाती जाणारा आहे. वाशीम बाजार समितीत आमदार लखन मलिक यांचे दोन समर्थक संचालक झाल्याने येथे भाजपचा प्रवेश बाजार समितीत झाला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या मतदारसंघातील कारंजा व मानोरा बाजार समितीत पक्षाचे पानिपत झाले आहे.

Vijay Jadhav, Raju Patil Raje, Shyam Badhe and Yogesh Deshpande.
Washim District APMC Analysis : भाजपने देशमुखांमुळे राखले रिसोड, बाकी सर्वत्र कॉंग्रेस-राष्ट्रवादीच !

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश पातळीवर संघटनेत मोठ्या प्रमाणात बदल होत असताना आता जिल्हाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आमदार राजेंद्र पाटणी हे भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष असल्याने बाजार समितीतील पराभवाची नैतिक जबाबदारी त्यांचीच असल्याने भाजप यावेळी नवीन जिल्हाध्यक्ष निवडताना कोणते निकष लावते, याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

दोन विधानसभा मतदारसंघ भाजपकडे असले तरी ग्रामीण भागात वट असणाऱ्या नेतृत्वाची चाचपणी सुरू आहे. यामध्ये माजी आमदार विजय जाधव, राजू पाटील राजे, शाम बढे यांच्यासह योगेश देशपांडे, धनंजय हेंद्रे यांच्या नावांची चर्चा आहे. यामध्ये विजय जाधव यांना जिल्हाध्यक्षपदासह भाजपच्या संघटन बांधणीचा प्रदीर्घ अनुभव आहे. राजू पाटील राजे यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान दिले असले तरी भाजपकडे सध्यातरी ग्रामीण भागाशी कनेक्ट असलेले दुसरे नेतृत्व नाही.

Vijay Jadhav, Raju Patil Raje, Shyam Badhe and Yogesh Deshpande.
Washim जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाचे यश दोन्ही आमदारांना विचार करायला लावणारे...

योगेश देशपांडे हे संघाच्या मुशीत तयार झालेले नेतृत्व आहे. तसेच संघटन पातळीवर आतापर्यंत त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. तसेच ग्रामीण भागातील त्यांचा संपर्कही दांडगा आहे. धनंजय हेंद्रे हे ही संघाचे (RSS) स्वयंसेवक असून संघटन पातळीवर त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. यामध्ये भाजप कोणाच्या पारड्यात जिल्हाध्यक्षपद टाकते, त्यावरच पक्षाचे जिल्ह्यातील भवितव्य अवलंबून राहणार आहे.

अनंतरावांची भूमिका काय ?

वाशीम (Washim) जिल्ह्याच्या राजकारणात (Politics) चार तप कार्यकर्त्यांचे मोहोळ सभोवताली कायम ठेवत सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवर पकड असलेले माजी खासदार अनंतराव देशमुख नुकतेच भाजपवासी झाले आहेत. भाजपच्या (BJP) संघटनेत अनंतरावांची भर पडल्याने संपूर्ण जिल्ह्यात, गावखेड्यांत भाजपचा जनाधार दुपटीहून जास्त वाढला आहे. जिल्हाध्यक्ष निवडीत अनंतराव देशमुख यांचा विचार भाजपने केल्यास त्यांची भूमिका काय असणार, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com