नवघरेंकडून विटंबनाच; हिंगोलीत शिवरायांचा जलाभिषेक होणारच

महाराजांच्या पुतळ्याची विटंबना शिवसेना कधीही सहन करणार नाही.
नवघरेंकडून विटंबनाच; हिंगोलीत शिवरायांचा जलाभिषेक होणारच

हिंगोली : हिंगोलीच्या (Hingoli) वसमत शहरात (Vasamat City) झालेल्या प्रकारानंतर महाविकास आघाडीमधील (Mahavikas aghadi) वरिष्ठ नेत्यांची एकमेकांसोबत चर्चा झाली. मात्र शिवसैनिक (Shivsainik) आक्रमक झाले असून शिवरायांची झालेली विटंबना पुसून काढण्यासाठी जलाभिषेक करणारच, असे त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितल्याची विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. या कार्यक्रमामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे (MLA Raju Navghare) यांनी शिवाजी महाराजांच्या घोड्यावर चढून त्यांच्या प्रतिकृतीला पुष्पहार अर्पण केल्याने त्यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आमदार नवघरेंनी केलेली विटंबना पुसून टाकण्यासाठी आज वसमतमध्ये शेकडो शिवसैनिक शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करणार आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा (Jayprakash Mundada) यांनीही पुतळ्याची विटंबना केल्याचा शिवसेनेना खासदार हेमंत पाटील यांनी आरोप केला.

नवघरेंकडून विटंबनाच; हिंगोलीत शिवरायांचा जलाभिषेक होणारच
कार्यकर्ते पळवापळवीवरुन सुनील तटकरे- बाळासाहेब थोरातांमध्ये टोलेबाजी

दरम्यान, हिंगोलीच्या वसमत शहरात 13 ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा विराजमान करताना राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांच्याकडून अनावधानाने, शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यावर चढून पुष्पवृष्टी झाली. यानंतर समाज माध्यमांवरही आमदार नवघरे यांच्यावर टिका झाली. मात्र आपली चूक लक्षात येताच त्यांनी तातडीने माफी मागत आपली चूक कबूल केली. पण छत्रपती शिवाजी महाराज हे सबंध हिंदुस्थानचे आराध्यदैवत आहेत. त्यामुळे महाराजांच्या पुतळ्याची विटंबना शिवसेना कधीही सहन करणार नाही. असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.

आमदार राजू नवघरे शिवरायांच्या पुतळ्यावर चढल्याने महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. तसेच, पंचगंगा नदीचे पाणी आणि दुग्धाभिषेक करण्यासाठी शिवसेनेने तयारी सुरू केली आहे. शिवसेना खासदार हेमंत पाटील व आमदार संतोष बांगर हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याच बरोबर, शिवसेनेच्या दुग्धाभिषेक या कार्यक्रमात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com