West Vidarbha News : सावरकर गौरव यात्रा - पश्‍चिम विदर्भाची जबाबदारी ‘या’ सावरकरांवर !

Uddhav Thackeray : काँग्रेसबरोबरची युती उद्धव ठाकरे यांनी तोडून दाखवावी.
Randhir Sawarkar and Sanjay Kute
Randhir Sawarkar and Sanjay KuteSarkarnama

BJP's Savarkar Gaurav Yatra : देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून देण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतर्फे पश्चिम विदर्भात ३० मार्च ते ६ एप्रिल या काळात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेद्वारे नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे. (Uddhav Thackeray should break the alliance with Congress)

भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर आणि आमदार डॉ. संजय कुटे याबाबत माहिती देताना म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अवमान करणाऱ्या काँग्रेसबरोबरची युती उद्धव ठाकरे यांनी तोडून दाखवावीच. पश्चिम विदर्भातील ३२ मतदारसंघांतून ही यात्रा प्रवास करणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या स्थापना दिनी ६ एप्रिल रोजी या यात्रेचा समारोप होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण स्वतः या यात्रेत सहभागी होणार आहोत. महाविकास आघाडीचे सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार होणारा अपमान निमूटपणे सहन केला. सत्ता टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार सोडून दिला.

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला रस्त्यावर उतरून जोडे मारले होते. तशी हिंमत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दाखवायला हवी होती. उद्धव ठाकरेंकडे धाडस असेल तर त्यांनी राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) प्रतिमेला जोडे मारावे आणि काँग्रेसबरोबरची आघाडी तोडून टाकावी, असे आव्हान त्यांना दिले होते. मात्र, हे आव्हान त्यांनी स्वीकारले नाही, असेही आमदार सावरकर, आमदार डॉ. कुटे यांनी सांगितले.

Randhir Sawarkar and Sanjay Kute
Bjp On Name Change News : `छत्रपती संभाजीगर` च्या समर्थनात ठाकरे गटाचा एक अर्ज दाखवा, लाखाचे बक्षिस मिळवा..

या यात्रेसाठी प्रदेश संयोजक म्हणून प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे सावरकर यांनी सांगितले. यात्रेचे विभागवार प्रमुख असे - मुंबईसाठी आ. अमित साटम, ठाणे -कोकण - आ. निरंजन डावखरे, आ.नितेश राणे, पश्चिम महाराष्ट्र - प्रदेश महामंत्री मुरलीधर मोहोळ, विक्रम पावसकर, उत्तर महाराष्ट्र - आ. जयकुमार रावल, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, मराठवाडा - आ. संभाजी निलंगेकर, प्रदेश महामंत्री संजय केणेकर, पूर्व विदर्भ - आ. प्रवीण दटके, (Pravin Datke)आ. विजय रहांगडाले, पश्चिम विदर्भ- आ. संजय कुटे, प्रदेश महामंत्री आ. रणधीर सावरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com