पंजाबराव ठाकरे
संग्रामपूर (जि. बुलडाणा) : पारंपरिक लाठी काठीचा खेळ लुप्त होत असताना मिरवणूकीमध्ये त्याला उजाळा देऊन आनंद घेण्याचे काम एका आमदार महोदयांनी गणेश भक्तांसोबत केला. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
काल झालेल्या गणेश विसर्जनादरम्यान जळगाव जामोद विधानसभा मतदरसंघाचे आमदार डाॅ. संजय कुटे (Dr. Sanjay Kute) यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवीत स्वतः मिरवणूकीमध्ये लाठी-काठी फिरवत भजनामध्ये सहभाग नोंदवला. प्रशासनाची जबाबदारी स्वतःकडे घेऊन बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातील शांततापूर्ण शेगाव आणि जळगाव जामोद या शहरांतील मिरवणूक पार पडली. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदचे ठाणेदार खामगावच्या बंदोबस्तात असताना त्यांच्या जागी स्वतः आमदारांनी (MLA) महत्वाची भूमिका घेत गणेश भक्तांत तल्लीन होऊन गेले.
प्रशासन, गणेश मंडळ व नागरिकानमधे योग्य संवाद ठेवत आमदार डॉ. संजय कुटे यांनी शांततेत गणेश विसर्जनाचे नियोजन केले होते. त्यासाठी मिरवणूकीमध्ये जातीने हजर राहून शेगाव आणि जळगाव जामोद यांसारख्या मोठ्या शहरात रात्री उशिरापर्यत भक्तांना आनंद लुटता आला. इतकेच नाही तर मैदानी खेळांत स्वतः सहभागी होऊन ऑल इन वन असल्याचे सिद्ध केले.
राज्यातील सत्ता बदलामध्ये राज्यभरातच नाही तर इतर राज्यांतही आमदार तथा माजी मंत्री डाॅ. संजय कुटे यांचे नाव गाजले आहे. त्यानंतर गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये आमदारांचा उत्साह पाहता युवा वर्गात जोश निर्माण झाला होता. त्या सर्व बाबींचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अभ्यासू आणि सर्वसामान्य जनतेसह बालक असो की तरुण वर्ग सर्वांमध्ये समरस होणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच आमदार कुटे म्हटले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.