डिगडोह नगर परिषद करण्यासाठी लोकप्रतिनिधी देणार राजीनामे, आमदार मेघेंची घेतली भेट...

निवडणुकांपूर्वीच नगर परिषद करण्यात यावी, यासाठी डिगडोह प्राधिकरण संघर्ष समितीच्या माध्यमातून आमदार समीर मेघे (Sameer Meghe) यांना निवेदन देण्यात आले.
Sameer Meghe
Sameer MegheSarkarnama

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून डिगडोह(देवी) ग्रामपंचायतीचे प्राधिकरण बदलून नगरपरिषद करण्यात यावी, यासाठी नागरिक व काही लोकप्रतिनिधींचा दबाव वाढत आहे. ग्रामपंचायत सदस्य विनोद ठाकरे यांनी घुग्गुसच्या धर्तीवर या मागणीचा दबाव वाढवण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांनी राजीनामे फेकावे, असे आवाहन केले होते. आमदार समीर मेघेंसोबत झालेल्या एका सर्वपक्षीय बैठकीत जि.प. सदस्य व पं.स. सदस्यांनी आमदार मेघेंसमोर राजीनामे देण्याची तयारी दर्शवली.

डिगडोह गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहरीकरण बघता ग्रामपंचायत (Grampanchayat) निवडणुकांपूर्वीच नगर परिषद करण्यात यावी, यासाठी डिगडोह प्राधिकरण संघर्ष समितीच्या माध्यमातून आमदार समीर मेघे (Sameer Meghe) यांना निवेदन देण्यात आले. डिगडोह परिसरात काही विकासकामांचे भूमिपूजन करण्यासाठी आमदार समीर मेघे आले होते. यावेळी बालाजी नगर स्थित माऊली चौकात छोटी सभा घेऊन सर्व राजकीय पक्षांचे नेते व गावातील ज्येष्ठ नागरिकांनी आमदार मेघे यांच्यापुढे ही मागणी रेटून धरली. यापूर्वी गावातही यावर एकमत करून ग्रामपंचायतीमध्ये ठराव घेऊन तो पं.स.मार्फत जि.प.कडे पाठविण्यात आला आहे. प्राधिकरण बदल होत असल्यास ग्रा.पं.सदस्य विनोद ठाकरे यांच्या नेतृत्वात आधीच आठ सदस्यांनी पदाचा राजीनामा देण्याचीसुद्धा घोषणा केली आहे. त्यामुळे राज्य सरकारनेसुद्धा (State Government) याकडे लक्ष देण्यासाठी आमदार मेघे यांनी विशेष लक्ष देण्याची मागणी येथील नागरिकांची आहे. पं.स.व जि.प.सदस्यांनी सुद्धा राजीनामा देण्याची कबुली यावेळी दिली.

बालाजी नगर येथे निवेदन देण्यासाठी अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, उपाध्यक्ष राजेश गाडगे, जि.प.सदस्या अर्चना गिरी, रश्मी कोटगुले, पं.स.उपसभापती उमेश राजपूत, सदस्य लिलाधर पटले, सरपंच इंद्रायणी काळबांडे, उपसरपंच कैलास गिरी, माजी सरपंच दामोदर सांगोले, चेतनलाल पांडे, किराणा व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर देशमुख, रवींद्र जैन, केमिस्ट असोसिएशनचे बबनराव पडोळे, बालाजी शिक्षण संस्थेचे संचालक दिवाकरराव दळवी, शिवसेनेचे नेते रवी जोडांगळे, ग्रा.पं.सदस्य विनोद ठाकरे, प्रदीप इंगोले, राजेश बोरकर, हेमंत देशमुख, ज्योती कथलकर, सीमा शर्मा, वानखेडे, साबळे, किशोर पाटील, अनिल शर्मा, संजय वानखेडे, डिगडोह जागृती मंचचे मोनू सिंग, मंगेश लोखंडे, महेश लोखंडे, प्रवीण झा, विष्णुपंत बानाइत, राकेश उमाळे, राकेश यादव आदींची उपस्थिती होती.

Sameer Meghe
आमदार समीर मेघे म्हणाले, ‘त्या’ ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करा...

..तर राजीनामे देणार !

प्राधिकरण बदल करण्यासाठी घुग्गुसच्या धर्तीवर गावातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी राजीनामे द्यावेत, अशी सूचना ग्रा.पं.सदस्य विनोद ठाकरे यांनी ठेवली होती. आज झालेल्या सभेत ग्रा.पं.चे प्राधिकरण व्हावे, यासाठी सर्वपक्षीय नेते व स्थानिक संघटनांची दबाव येताच जि.प.सदस्य, पं.स.सदस्यांनी प्राधिकरण बदलासाठी राजीनामे देण्याची तयारी दर्शविली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com