Nagpur Central Assembly Constituency: मध्य नागपूरमध्ये 'बाजीराव' कोण ठरणार ?

Central Nagpur assembly constituency tight contest: नागपूर शहरामध्ये सर्वाधिक चुरशीचा सामना मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात रंगल्याचे दिसून आले. या मतदारसंघात कोणत्याच उमेदवाराला विजयाची खात्री देता येत नसल्याची परिस्थिती आहे. या मतदारसंगातील निकालाचा अंदाज भल्याभल्यांना वर्तवणे अवघड झाले आहे.
Praveen Datke, Bunty Shelke, Yashwant Bajirao
Praveen Datke, Bunty Shelke, Yashwant BajiraoSarkrnama
Published on
Updated on

Nagpur News, 21 Nov : नागपूर शहरामध्ये सर्वाधिक चुरशीचा सामना मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात रंगल्याचे दिसून आले. या मतदारसंघात कोणत्याच उमेदवाराला विजयाची खात्री देता येत नसल्याची परिस्थिती आहे.

या मतदारसंगातील निकालाचा अंदाज भल्याभल्यांना वर्तवणे अवघड झाले आहे. या मतदारसंघात सुमारे 30 वर्षांपूर्वी अशीच लढत झाली होती. त्यात काँग्रेस (Congress) आणि भाजपचे उमेदवार नसलेले उमेदवार यशवंत बाजीराव अवघ्या सहा मतांनी निवडून आले होते.

यावेळी तशीच परिस्थिती इथे असल्याचं मतदारसंघात बोलले जात आहे. मध्य नागपूर हलबा आणि मुस्लिमबहूल मतदारसंघ आहे. यापूर्वी हलबा आणि मुस्लिम समाजाचाच उमेदवार या मतदारसंघातून प्रामुख्याने निवडून आला होता. राज्याचे माजी मंत्री अनिस अहमद आणि भाजपच्या विजयाची हॅटट्रिक मिळवून देणारे विकास कुंभारे हे या मतदारसंघाचे आमदार होते.

मात्र यावेळी भाजप (BJP) आणि काँग्रेस दोन्ही पक्षाने या समाजाला प्रतिनिधित्व दिले नाही. भाजपने धाडसी निर्णय घेऊन युवा नेते आणि विधान परिषदेचे सदस्य प्रवीण दटके यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे प्रामुख्याने भाजपकडे असलेल्या हलबा समाजामध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता.

त्यांनी समाजाचे प्रतिनिधी म्हणून रमेश पुणेकर यांना निवडणुकीत उभे केले आहे. सर्व समाजाने त्यांच्यासाठी लोकवर्गणी केली आहे. आपल्याच समाजाला मतदान करण्याच्या शपथा दिल्या. असे असले तरी मतदानाच्या दिवशी समाजातील उत्साह मावळला होता. दगडापेक्षा वीट मऊ याचाही विचार अनेकांनी मतदान केलं असल्याचे बोलले जात आहे.

Praveen Datke, Bunty Shelke, Yashwant Bajirao
Pune News : विजयाचा कॉन्फिडन्स! पुण्यात निकालापूर्वीच फोडले फटाके

दुसरीकडे मुस्लिम समाजाच रोष काँग्रेसवर होता. काँग्रेसने बंटी शेळके यांना उमेदवारी दिल्याने अनेकजण नाराज होते. मुस्लिमांकडे दुसरा पर्यात फारसा उपलब्ध नव्हता. मुस्लिमांच्या मतांवरच बंटी शेळके यांचे भवितव्य अवलंबून आहे.

Praveen Datke, Bunty Shelke, Yashwant Bajirao
Mahavikas Aghadi : 'मी हे मान्य करणार नाही...'; काँग्रेसच्या नेतृत्वात 'मविआ'चं सरकार, पटोलेंच्या 'त्या' वक्तव्यावर राऊतांचा आक्षेप

मुस्लिम व हलबा वगळता उर्वरित मतदार ज्याला कौल देईल तो निवडून येईल अशी परिस्थिती मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात आहे. विशेष म्हणजे माजी आमदार आणि हलबा समाजाचे प्रतिनिधी यशवंत बाजीराव यांनी प्रवीण दटके यांना पाठिंबा जाहीर केला होता असा दावा भाजपच्यावतीने केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com